Acquire knowledge if you want to survive the competition
Guardian Minister Sudhirbhau Mungantiwar’s assertion
Yuva Warriors felicitated meritorious students
चंद्रपूर (चंद्रपूर टुडे):- वर्तमान युग हे स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे काही प्राप्त करायचे असेल तर संघर्ष करावा लागणार आहे. स्पर्धेच्या युगातील हा संघर्ष अधिकाधिक ज्ञान संपादित करून कमी करता येऊ शकतो. यासाठी आपण गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी वाचनालय व अभ्यासिका उघडल्या आहेत. त्याचा उपयोग करा. स्पर्धेत टिकायचे असेल तर ज्ञान संपादन करा, असे प्रतिपादन राज्याचे कॅबिनेट व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार Minister Sudhir Mungantiwar यांनी केले.ते युवा वरीयर्स तर्फे ‘गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार’ कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मंगळवार (25 जून) ला प्रियदर्शीनी सभागृहात बोलत होते.
यावेळी मंचावर भाजपा जेष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, प्रमोद कडू, जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, राहुल पावडे, महासचिव डॉ गुलवाडे, ब्रिजभूषण पाझारे, किरण बुटले, सुरज पेदुलवार, प्रज्वलंत कडू, महेश देवकते, विशाल निंबाळकर, युवा वरीयर्स प्रमुख सोहम बुटले, भाजपा नेते मोनीषा महाजन, सचिन आगलावे, रवी लोणकर, आशिष देवतळे, अनिल डोंगरे यांची उपस्थिती होती.
यावेळी इयत्ता 10 व बारावीतील 598 गुणवंत विद्यार्थ्यांचा ना.मुनगंटीवार यांचे हस्ते सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. Yuva Warriors felicitated meritorious students
ना.मुनगंटीवार पुढे म्हणाले,जे विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले नाही,त्यांना परिश्रमाची गरज आहे. एकाग्रता, संयम, सहनशीलता व सातत्य या गुणांचा अंगीकार कराल तर यशस्वी व्हाल. संघर्ष करतांना हरले तर लाजू नका व जिंकले तर माजू नका, असा मौलिक संदेश त्यांनी भावी पिढीला दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऋषिकेश बुटले तर संचालन रिशा भास्कर, उत्कर्ष नागापुरे यांनी केले. अनिकेत मगरे यांनी आभार मानले. ना.मुनगंटीवार यांचे हस्ते भारतमाता पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा वरीयर्सचे अनिकेत मगरे,रिशा भास्कर,रोहन वाडवे,पियुष वैरागडे,उत्कर्ष नागापुरे,साई सूचक,आदित्य झा,हर्षल वनकर,अहमद शेख व गणेश जामदार यांनी परिश्रम घेतले.