Many youths joined Aam Aadmi Party
चंद्रपूर :- आम आदमी पार्टीचे तडफदार नेते तथा युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आप पक्षात प्रवेश व नियुक्ती प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. चंद्रपूर येथील बी जी सेलिब्रेशन हॉल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळेस अनेक युवक कार्यकर्त्यांनी राजू कुडे यांचा नेतृत्वात पक्ष प्रवेश केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदेश संघटन सचिव भूषण ढाकुलकर यांनी उपस्थित मान्यवरांना पक्षाचे ध्येय धोरण आणि आम आदमी पार्टीची गरज काय हे आपल्या भाषणातून पटवून दिले.
कार्यक्रम आयोजक राजू कुडे यांनी नवनियुक्त झालेल्या युवा पदाधिकाऱ्यांना जोमाने कामाला लागावे व सत्ताधारी बीजेपी आणि विरोधक काँग्रेस यांना यावेळी घरी बसवण्याचे काम करायचे आहे असे यावेळी सांगितले, केजरीवाल यांचे काम घर टॅक्स हाफ, नळ बिल माफ, मोफत शिक्षा, स्वास्थ इत्यादी कामे जनते पर्यंत पोहचवावे असे सुध्दा सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन जावेद सय्यद अल्पसंख्यांक महानगर अध्यक्ष यांनी केले तर कार्यक्रमाला यशस्वी करणायाकरिता अनुप तेलतुबडे, मनीष राऊत, आदित्य नंदनवार, जयदेव देवगडे, फहीम शेख, शशिकांत मेश्राम, सागर बोबडे, राजिक भाई यांनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला वरिष्ठ नेते सुनील मुसळे, जिल्हा अध्यक्ष मयुर राईकवार, जिल्हा संघटनमंत्री योगेश मु-हेकर, जिल्हा संघटनमंत्री शंकर सरदार, जिल्हा संघटनमंत्री भिवराज सोनी, जिल्हा कोषाध्यक्ष सरफराज शेख, जिल्हा सचिव राज नगराळे, जिल्हा विधि सल्लागार एड. किशोर पुसलवार, जिल्हा सदस्य परमजीत सिंह झगड़े, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, महानगर अध्यक्ष तबस्सुम शेख, संघटन मंत्री संतोष बोपचे, बल्लारपुर शहर अध्यक्ष रवि पुप्पलवार, जिल्हा सहसचिव सोनल पाटिल, सुनील सदभैया, विशाल माने, सुजाता देठे, नजमा बेग, करुणाताई, रमनाताई, साफिया, सुमित हस्तक, जितेंद्र भाटिया, रणजीत बोरकुटे, राजू तोडासे, वीरू खोब्रागडे, सुरेंद्र जीवणे, सचिन मत्ते, इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.