Thursday, February 22, 2024
Homeआरोग्यचंद्रपूरच्या युवकांनी रक्तदानाने वाचविले गडचिरोलीतील महिलेचे प्राण

चंद्रपूरच्या युवकांनी रक्तदानाने वाचविले गडचिरोलीतील महिलेचे प्राण

youth of Chandrapur saved the life of a woman in Gadchiroli by donating blood

चंद्रपूर :- गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील नविता दुर्गे या गर्भवती महिलेला प्रसूती काळात दुर्लभ असलेल्या AB निगेटिव्ह रक्त गटाची आवश्यकता निर्माण झाली, दुर्लभ रक्तगट असल्याने गडचिरोली येथे AB निगेटिव्ह रक्तगट उपलब्ध झाले नाही. Blood Donation

दरम्यान चंद्रपूर येथील रक्तमित्र संघटनेचे संपर्क प्रमुख रिंकू कुमरे यांना सदर बाब कळताच, त्यांनी पडोली येथील विपीन कोंगरे यांचे रक्तगट AB निगेटिव्ह असल्याने त्याला तातडीने रक्तदान करण्यासाठी गडचिरोलीला रवाना करीत, विपीन कोंगरे यांनी रक्तदान करून गर्भवती महिला व त्यांचे नवजात शिशु अश्या दोघांना जीवनदान दिले.

रक्तदानाच्या या तत्परतेमुळे गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेत रक्तदाता विपीन कोंगरे व रिंकू कुमरे यांची प्रशंसा केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular