Celebrate World Nurses Day at St. Paul’s College of Nursing
चंद्रपूर :- सेंट पॉल नर्सिंग कॉलेज बामणी, बल्लारपूर, येथे जागतिक परिचारिका दिन World Nurses Day निमित्त सात दिवसीय कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित सेंट पॉल नर्सिंग कॉलेजचे संचालक अविनाश खैरे, सेंट पॉल स्कुलच्या संचालिका नीना खैरे, कॉलेजचे प्राचार्या प्राची वेलगंधवार तसेच कॉलेजचे इतर शिक्षक उपस्थित होते. St. Paul College of Nursing Ballarpur
कार्यक्रमाच्या सुरूवातीला Florence’s nightingale यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. त्यानंतर अविनाश खैरे यांनी Florence’s birthday जागतिक परिचारिका दिवसानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते वेळी म्हणाले की Florence’s nightingale हीने युध्दात जखमी सैनिकांना अविरत सेवा दिली आणि आपले पुर्ण आयुष्य नर्सिंग क्षेत्राला वाहुन दिले. Florence’s nightingale चा बर्थ डे म्हणजे प्रत्येक नर्सेसचा वाढदिवस असतो. तुम्ही आपले कार्य व्यवस्थितपणे पार पाडा, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

या कार्यक्रमात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये पोस्टर स्पर्धा, फेस पेंटिंग, प्रश्न मंजुशा तसेच नत्य स्पर्धा व जि. एन.एम. ततिय वर्ष यांनी Florence’s nightingale च्या जिवनावर नाटिका सादर केली. असे कार्यक्रम घेण्यात आले.
कार्यकमात सहभागी झालेल्या विद्यार्थांना बक्षिस वाटप करून त्यांचे कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन जी.एन.एम. तृतीय वर्षाची विद्यार्थिनी संपदा खडसिंगे व वैधवी भगत हिने केले तर आभार प्रदर्शन प्रेरना पंधरे हिने केले.