Monday, March 17, 2025
HomeEducationalजागतिक हिवताप दिवस उर्जानगर जि. प. शाळेत साजरा

जागतिक हिवताप दिवस उर्जानगर जि. प. शाळेत साजरा

World Malaria Day celebrated at Urjanagar Zilla Parishad School

चंद्रपुर :- उर्जानगर कोंडी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत आज दिनांक 25 एप्रिल रोजी प्रा.आ.केंद्र दुर्गापूर अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्र 1, 2 व 3 च्या सर्व आशाताईंनी मिळून जागतिक हिवताप दिवस थाटात साजरा केला. World Malaria Day

कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोषभाऊ पारखी, उर्जानगर ग्रा. पं. सदस्य राजूभाऊ डोमकावळे, मुख्याध्यापक धानोरकर सर, दुर्गापूर प्रा. आ. केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष वाकडे, आरोग्य सहाय्यक खामनकर, मेश्राम, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अधिकारी दिपक मंदूरकर, आरोग्य सेवक लाकडे, आशा गटप्रवर्तक सारिका गेडाम, आशाताई जयवंता रामटेके, संगीता मोरे, कुसुम येलमुले, किरण दहिवले, अनिता चिवंडे व शिक्षकवृंदांची उपस्थिती होती.

तसेच जागतिक हिवताप दिवसाविषयी जनजागृती करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी रांगोळी स्पर्धा व रॅली मध्ये सहभाग नोंदवुन रांगोळी स्पर्धेत पहिला क्रमांक शिवाणी भारद्वाज तर दूसरा क्रमांक प्रेरणा क्षिरसागर यांनी पटकावुन अतिशय बोलकी व आजच्या दिनाचे संदेशवहन करणारी रांगोळी विद्यार्थ्यांनी काढली.

त्याचप्रमाणे वैद्यकीय अधिकारी डॉ. वाकडे यांनी 25 एप्रिल जागतिक हिवताप दिवसाविषयी विद्यार्थ्यांना व उपस्थितांना मार्गदर्शन केल्यानंतर हिवताप जनजागृती संबंधित घोषणा करत गावातून रॅली काढण्यात आली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular