Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्र राज्यजागतिक ग्राहक दिन मोठ्या उल्हासात साजरा

जागतिक ग्राहक दिन मोठ्या उल्हासात साजरा

World Consumer Day is celebrated with great fanfare

चंद्रपूर -: दरवर्षीप्रमाणे यंदाही आजच्या दिवशी जागतिक ग्राहक दिन मोठ्या उल्हासात साजरा केला जात असून जागतिक ग्राहक दिनानिमित्य ग्राहकांची जनजागृती, त्यांचे हक्क, तक्रार निवारण, वस्तू खरेदी, वापर करण्याचा अधिकारी इत्यादी ग्राहक हितार्थ विषयासंदर्भात मार्गदर्शन करत आजच्या दिनी जगभरात ग्राहक दिन साजरा करून ग्राहकांच्या हक्काची अधिकाराची जाणीव करून दिली जाते.

याचेच औचित्य साधून आज चंद्रपुर येथील VIP विश्राम गृह तसेच चंद्रपुर ग्राहक न्यायालयात ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती, चंद्रपूर तर्फे ग्राहक दिन मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात ग्राहक न्यायालय, चंद्रपूर येथे आयोजित ग्राहक दिनानिमित्य ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती, चंद्रपूरचे सर्व पदाधिकारी उपस्थित होऊन ग्राहक न्यायालय येथील अधिकारी, न्यायाधीश व उपस्तितांना ग्राहक दीनाच्या शुभेच्छा देत ग्राहकांच्या समस्या, तक्रार निवारण करण्या संदर्भात चर्चा करण्यात आली.

ग्राहक न्यायालय, चंद्रपूर मार्फत ग्राहकांच्या समस्या निवारणासंदर्भात जनजागृती करण्यात आली. तसेच उपस्थित नागरिकांन करीता स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा सर्व उपस्थितांनी आस्वाद घेतला.

यावेळी चंद्रपूर ग्राहक न्यायालय अधिकारी सचिन जैस्वाल, ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संतोष पारखी, जिल्हा उपाध्यक्ष विरेंद्र पुणेकर, जिल्हा उपाध्यक्ष संजय शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद धिमान, जिल्हा सचिव मुन्ना ईलटम, जिल्हा मिडिया प्रमुख धम्मशिल शेंडे व सर्व सहकारी उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular