Sunday, March 23, 2025
HomeLoksabha Electionआपणच उमेदवार आहोत या भावनेने निवडणुकीत काम करा - सुधीर मुनगंटीवार

आपणच उमेदवार आहोत या भावनेने निवडणुकीत काम करा – सुधीर मुनगंटीवार

Work in elections with the feeling that you are the candidate – Sudhir Mungantiwar.                         Rajura Assembly Bjp Officers meeting concluded

विजय संकल्पाची मशाल पेटविण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन                                                               राजुरा विधानसभा पदाधिकारी बैठक संपन्न

चंद्रपूर :-  मा. पंतप्रधान विश्वगौरव श्री. नरेंद्र मोदी PM Narendra Modi यांनी मला लोकसभा निवडणूक Loksabha Election लढण्याची संधी दिली हे माझे भाग्य आहे. त्यांचा विश्वास सार्थकी लावण्यासाठी माझ्या कार्यकर्त्यांना विजय संकल्पाची मशाल पेटवावी लागेल. त्यासाठी माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपणच निवडणुकीत उमेदवार आहोत या भावनेने काम करावे, असे आवाहन महाराष्‍ट्राचे वने, सांस्‍कृतिक कार्य आणि मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री व चंद्रपूर मतदारसंघाचे लोकसभेचे उमेदवार मा. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.*

राजुरा विधानसभा पदाधिका-यांची बैठक शनिवार, 23 मार्च रोजी नक्षत्र लॉन, राजुरा येथे पार पडली. या बैठकीला ना. सुधीर मुनगंटीवार संबोधित करत होते. ‘एक रुपयांचा आशीर्वाद’ हा उपक्रम राजुरा विधानसभा क्षेत्रात तुम्‍ही शंभर टक्के यशस्वी केला. हा एक रुपया जनतेकडून मिळालेला मोलाचा आशीर्वाद असून यामुळे आपले बळ वाढले आहे. आता कोणीही विरोधात लढले तरी चिंता नाही,’ अशी गर्जनाही ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

कॉंग्रेसच्‍या खोट्या प्रचाराला बळी पडू नका
काँग्रेसचे राजकारण हे मायावी रावणासारखे असून खोटे बोलून मुस्लिम समाजाला भडकविण्याचे काम ते करीत आहेत. मात्र भारतीय जनता पक्षाने मुस्लिम समाजासाठी ज‍ितके काम केले तितके आजपर्यंत कोणत्‍याच पक्षाने केलेले नाही. त्यामुळे काँग्रेसच्या खोट्या प्रचाराला मतदार बळी पडू नका, असे आवाहन ना. मुनगंटीवार यांनी केले.

ये दोस्ती… हम नही तोडेंगे
प्रत्येक बूथ वर शिंदे-गट, आठवले-गट आणि आपल्या सहकारी पक्षांसोबत मित्रत्वाची भावना ठेऊन आपण जोमाने कामाला लागावे, असे सांगताना ना. मुंगंटीवार यांनी ये दोस्ती… हम नही तोडेंगे म्हणत प्रत्येक कार्यकर्ता एकत्रिक काम करण्याच्या भावनेने पुढे यावा, असे म्‍हणत कार्यकर्त्‍यांमधला उत्‍साह वाढवला.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular