Thursday, February 22, 2024
Homeक्रीडा व मनोरंजनरमाई आंबेडकरांचा जागर करून 'वुमेन्स पाॅवर दांडिया'चा समारोप ; नानाजी नगर महिला...

रमाई आंबेडकरांचा जागर करून ‘वुमेन्स पाॅवर दांडिया’चा समारोप ; नानाजी नगर महिला मंडळाचा स्तुत्य उपक्रम

Women’s Power Dandiya’ concluded with Ramai Ambedkar’s Jagar
A commendable initiative by Nanaji Nagar Mahila Mandal.                                                 चंद्रपूर :- नागपूर रोडवरील नानाजी नगर येथील दत्त मंदिराच्या पटांगणात नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या वुमेन्स पाॅवर दांडिया मध्ये अखेरच्या दिवशी रमाई आंबेडकर यांच्या कार्याचा जागर करण्यात आला. यानंतर स्वतःच्या 90% अपंगत्वावर मात करून दिव्यांग महिला व मुलींना रोजगार तसेच आधार मिळवून देणाऱ्या अर्चना मानलवार भोयर या कर्तबगार महिलेचा सत्कार करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.यावेळी वडगाव प्रभागाचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख, सेवानिवृत्त शिक्षक मनोज भैसारे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल वलादे यांनी तर आभार प्रदर्शन नंदू पाहुणे यांनी केले.

या दांडिया कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता नानाजी नगर महिला मंडळाच्या माधुरी शास्त्रकार ,प्रविणा बरडे, माजी नगरसेविका अनुराधा हजारे,शुभांगी गावंडे,संगीता पाहुणे,मनिषा गावंडे,मनीषा बोबडे,संगीता वानखडे,अल्का लांडे ,जयश्री लांडे,वैशाली हिवरकर,साधना शेंडे,सपना राणा,कविता भांदककर,रमा देशमुख,प्रतीक्षा येरगुडे , श्रद्धा निकोडे , रीना बोरकर , योगिता नक्षीने, मीना पारखी , स्वीटी वैरागडे तसेच स्थानिक कार्यकर्ते गजानन गावंडे,अक्षय येरगुडे, नेहाल भांदककर,प्रकाश घुमे,अजिंक्य शास्त्रकार,घनश्याम पाचभाई,अश्विन भांदककर,विवेक बोरीकर,बंडू निकोडे,अजय लांडे,अनिल घुमे,रवि निखाडे,अनिल शेंडे यांनी अथक प्रयत्न केले. Women’s Power Dandiya’ concluded with Ramai Ambedkar’s Jagar ; A commendable initiative by Nanaji Nagar Mahila Mandal

◆ कर्तबगार महिला-मुली व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करिता Mla Pratibha Dhanorkar आमदार प्रतिभा धानोरकर, अधीपरिचारिका म्हणून उत्कृष्ट कामगीरीसाठी राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल पुष्पा पोडे पाचभाई, ज्ञानार्चना अपंगस्नेह बहुदेशीय संस्थेच्या अर्चना मानलवार भोयर, जिल्ह्यातील शैक्षणिक,सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या चांदा पब्लिक स्कूलच्या संचालक स्मिता जीवतोडे, झाडीपट्टीतील प्रसिध्द अभिनेत्री ज्योती रामावार,अनेक वर्षे गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्याच्या दुर्गम भागात सेव्या देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. सुचिता घोरमाडे,चंद्रपूर महाऔष्णिक विज निर्मिती केंद्रातील महिला कंत्राटदार दुर्गा मंजू अनिरुद्ध रजक,चंद्रपूरातील पहिल्या महिला ऑटो रिक्षा चालक अल्का कुसळे,प्यार फाउंडेशनमध्ये मुक्या पशूंची सेवा करणाऱ्या शितल दुर्गे,रिद्धी झोरे भूमिगत कोळसा खाणीसारखे आव्हानात्मक क्षेत्र निवडणारी मायनिंग इंजिनिरंगची विद्यार्थीनी इशिका कैथवास या कर्तबगार महिला व मुलींचा नवरात्री उत्सवातील दररोजच्या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
तसेच नवरात्रीमध्ये परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार सुध्दा करण्यात आला.

● नवरात्रीत नऊ थोर स्त्रीयांचा जागर
नानाजी नगर महिला मंडळ तर्फे आयोजीत या दांडिया कार्यक्रमात दररोज एका थोर स्त्रीच्या कार्याचा जागर करण्यात आला. राजमाता जिजाऊ ,महाराणी हिराई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, झांशीची राणी लक्ष्मीबाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,प्रथम मुस्लिम महिला शिक्षिका फातिमा शेख ,देशातील पहिल्या प्रॅक्टिसिंग महिला डॉक्टर व समाज सुधारक रख्माबाई राऊत, समाजसेविका मदर टेरेसा व रमाई आंबेडकर या नऊ थोर स्त्रीयांचा जागर दांडीयामध्ये करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular