Thursday, September 12, 2024
spot_img
spot_img
HomePoliticalदेशाच्या उज्वल भविष्यासाठी महिलांनी समोर यावे - आमदार प्रतिभा धानोरकर : जिल्हास्तरीय...

देशाच्या उज्वल भविष्यासाठी महिलांनी समोर यावे – आमदार प्रतिभा धानोरकर : जिल्हास्तरीय महिला मेळावा संपन्न.

Women should come forward for the bright future of the country. – MLA Pratibha Dhanorkar
District level women’s meeting concluded

चंद्रपूर :- घरापासून ते देशात कुठल्याही क्षेत्रात महिला आज अग्रेसर असुन आज देशाच्या विकासात महिलांचा मोठा वाटा असून भविष्यात देखील महिलांनी प्रत्येक कार्यात अग्रेसर राहुन काम केल्यास देश प्रगतीपथावर जाणार असल्याचे मत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ द्वारा आयोजित महिला मेळाव्यात व्यक्त केले.

रविवार दि. 10 मार्च 2024 रोजी साई मंगल कार्यालय वरोरा येथे जिल्हास्तरीय महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी कार्यक्रमाच्या उद्घाटीका म्हणून आमदार प्रतिभा धानोरकर उपस्थित होत्या. या प्रसंगी आमदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, आज घरापासून ते देशातील राष्ट्रपती पर्यंत महिला राज असून प्रत्येक क्षेत्रात महिला प्रगतीपथावर आहेत. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी समोर आल्यास देशाच्या जडणघडणीत महिलांचे मोठे योगदान असेल. तसेच देशाच्या उज्वल भविष्याकरीता महिलांनी आज समोर येणे गरजेचे असून चुल आणि मुल हि संकल्पना लवकरच दुर करावी. त्यासोबतच आपली प्रगती केल्यास परिवार सुखी होऊन राष्ट्र निर्माणास हातभार देखील लागणार असल्याचे मत व्यक्त केले. मुलांची पहिला शिक्षिका आई म्हणून सुरु होते व समोर या भुमीका वेगवेगळ्या स्तरावर बदलत असतात. त्यामुळे महिलांनी स्वतः चा आत्मसन्मान राखणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी इतर मान्यवरांनी देखील आपले मत व्यक्त केले.

या मेळाव्या प्रसंगी मंचावर प्रमुख उपस्थिती म्हणून संध्याताई सव्वालाखे प्रदेशाध्यक्ष महिला कॉग्रेस कमेटी महाराष्ट्र तसेचे देविदासजी बस्वदे अध्यक्ष अखिल महाराष्ट्र शिक्षक संघ, श्री. अण्णाराव आडे राज्य कार्याध्यक्ष, सौ. वंदना भोयर महीला विभाग प्रमुख, सौ. उर्मिलाताई बोंडे राज्य संयुक्त चिटणीस, श्री. पुरुषोत्तम गंधारे माजी कार्याध्यक्ष, श्री. संजय जांभुळे अध्यक्ष वरोरा तालुका यांसह अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular