Tuesday, March 25, 2025
HomeCrimeअवैध दारू बंदीसाठी नारीशक्ती धडकली राजुरा पोलीस स्टेशनवर

अवैध दारू बंदीसाठी नारीशक्ती धडकली राजुरा पोलीस स्टेशनवर

Women Power strikes at Rajura Police Station to ban illegal liquor: If strict action is not taken, strong agitation is warned

चंद्रपूर :- राजुरा तालुक्यातील मौजा पेलोरा येथील महिलांनी सरपंच अरूणा विनोद झाडे, पोलीस पाटील माधुरी खुजे, तंटामुक्त अध्यक्ष वसंता भोयर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेशन राजुरा येथे धडक देत गावात सुरू असलेल्या अवैध दारू दुकानांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी लावून धरली. Ban illegal liquor

गावातील महिलांनी अवैध्य दारू विक्रेता यांना दारू न विकण्यास वारंवार सूचना देऊन ही त्यांनी दारू विकणे बंद केलेले नाही व विक्रेत्या महिलेनी अश्लील शिवीगाळ केली. दारू हि पेल्लोरा गावात बाजीराव नगर चौकात विकली जाते. व तिथे लहान मुले, मुली व शाळेत जाणारे विधार्थी ये जा करत असतात.

आज महाराष्ट्रात बदलापूरमध्ये बलत्कार झालेली घटना पाहता अशा घटनाना दारूमुळे वाव मिळू शकते. त्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांवर दोन दिवसात कठोर कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे.

यावेळी पेल्लोराच्या सरपंच अरुणा बिनोद झाडे, पोलीस पाटील माधुरी प्रमोद खुजे, तमुस अध्यक्ष वसंता मारोती भोयर, कृ. उ. बा. स. संचालक विनोद झाडे, नंदकिशोर अडबाले, उज्वला रामदास अडबाले, सींधुबाई गणपत वडस्कर, संध्या बंडु पेंदोर, शशिकला गजानन मडावी, देवकाबाई देरकर, सुरेखा पेंदोर, माधुरी मट्टे, वैशाली टेकाम, कविता टेकाम, रेखा गौरकर, वंदना आत्राम, दिपाली सुरतेकर, रेखा टेकाम, ज्योती मळावी यासह पेल्लोरा येथील महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular