Women need to be empowered for a strong nation and state
चंद्रपूर :- समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा रिपब्लिकन पक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समिती चंद्रपूरच्या विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त कार्यकमाचे आयोजन बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे भवन परिसर चंद्रपूर येथे करण्यात आले.
प्रथमतः राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले आणि त्यागमुर्ति रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, अध्यक्षस्थानी समितीच्या अध्यक्षा निर्मला नगराळे होत्या.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्योती सहारे यांनी भारतातील स्त्री उद्धाराकरीता क्रांतिकारी लढा देणाऱ्या इतिहास उपस्थितांना अवगत करून दिला.
संगीता घोडेस्वार यांनी महिलांच्या जीवनात शिक्षणाच्या महत्त्व विषद केले. मृणाल कांबळे यांनी आपल्या भाषणात सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात महिलांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
प्रस्ताविक प्रेरणा करमरकर यांनी तर संचालन अनिता जोगे यांनी केले.
यावेळी माजी नगरसेविका संगीता पेटकुले, छाया सोनुले,ज्योती शिवणकर, अश्विनी आवळे, पंचफुला वेल्हेकर, वर्षा घडसे, परिणीता रामटेके, वैशाली साठे, छाया थोरात, पौर्णिमा जुलमे, कविता देवगडे, संध्या करमरकर, वत्सला रामटेके, ज्योती टेंभूर्णे यांच्यासह महिला पुरुषांची उपस्थिती होती.