Women justice conference held by Chandrapur Women’s Congress
चंद्रपूर:- अखिल भारतीय महिला काँग्रेस च्या निर्देशानुसार तसेच प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दिनांक 3 मार्च ला येथिल जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात ‘नारी न्याय संमेलन’ तथा चंद्रपूर महिला काँग्रेस (ग्रामिण) ची आढावा बैठक पार पडली. राहुल गांधी Rahul Gandhi यांच्या भारत जोडो न्याय यात्रे Bharat jodo Justice Yatra मध्ये नारी न्याय हा महत्वपूर्ण मुद्दा आहे, त्या अनुषंगाने संपूर्ण देशामध्ये महिला काँग्रेस Women’s Congress तर्फे नारी न्याय संमेलन आयोजित करण्यात येत आहे, त्याच पार्श्वभूमीवर आज चंद्रपूर महिला काँग्रेस तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात जेष्ठ अधिवक्ता वर्षा जामदार यांनी महिलांचे हित जोपासणाऱ्या कायद्याची माहिती उपस्थित महिलांना दिली. यावेळी महिला काँग्रेस मध्ये महत्वपूर्ण कामगिरी बजवणाऱ्या महिलांचे सत्कार करण्यात आले या मध्ये प्रामुख्याने अनुसूचित विभागाच्या प्रदेश उपाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, शहर अध्यक्ष चंदा वैरागडे तसेच माजी नगरसेविका विना खनके, सकिना अन्सारी यांचा समावेश होता. महिला काँग्रेस ला नेहमी सहकार्य करणाऱ्या घुगूस शहर काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष राजू रेड्डी यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी नारी न्याय संमेलना बद्दल ची माहिती उपस्थित पदाधिकार्यांना दिली. तसेच केवळ काँग्रेस पक्षच महिलांचे हित जोपासू शकतो, दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी Rajiv Gandhi यांच्या मुळेच महिलांना पंचायत राज मध्ये 33% आरक्षण मिळाले. भाजपने मात्र महिला आरक्षणाच्या नावाखाली महिलांची फसवणूक केली अशी सडेतोड टीका ठेमस्कर यांनी यावेळी केली. Women justice conference held by Chandrapur Women’s Congress
या कार्यक्रमाला महिला काँग्रेस चे सर्व पदाधिकारी, तालुका अध्यक्ष उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चंद्रपूर महिला काँग्रेस च्या तालुका अध्यक्ष शीतल कातकर, सेवादल महिला काँग्रेस च्या शहर अध्यक्ष लता बारापात्रे, जिल्हा उपाध्यक्ष शोभा वाघमारे, लता निंदेकर, जिल्हा महासचिव मीनाक्षी गुजरकर,मेहेक सय्यद, संगीता मित्तल, नेहा मेश्राम, सचिव सीमा धुर्वे, श्रुती कांबळे, माला माणिकपुरी, निशा धोंगडे, चंद्रपूर जिल्हा सोशल मीडिया चे अध्यक्ष मुन्ना तावाडे, इन्जी नरेन्द्र डोंगरे, शिवाजी गोरघाटे,पवन जगताप, बिराज नारायणे, महेश रंगारी, नितीन जुमडे यांनी परिश्रम घेतले.