MPs protest against Karnataka Emta for justice demands of project victims…
Will continue to fight for the issues of the project victims – MP Pratibha Dhanorkar
चंद्रपूर :- भद्रावती स्थीत कर्नाटक एम्प्टा हि खदान नेहमी ह्या-ना त्या कारणाने चर्चेत असते. शासनाचे कायदे पायदळी तुडवू पाहणाऱ्या कर्नाटक एम्टा खदानीच्या विरोधात प्रकल्प ग्रस्तांच्या न्याय मागण्यांसाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आंदोलन करुन कोळसा खान बंद केली.
कर्नाटक एम्टा हि कोळसा खान काही वर्श बंद असल्यानंतर नव्या दमाने सुरु झाली. त्या ठिकाणी अनेक प्रकल्पग्रस्तांच्या न्याय मागण्यांसाठी अनेक आंदोलने झाली. परंतु कर्नाटक एम्टा मुजोरी धोरणामुळे प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न मागे पडत राहिले. सदर कंपनी आज घडीला शासनालाही जुमानत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अनेक लोकप्रतिनिधींनी या विरोधात आंदोलने केली. परंतु तेथील अधिकारी वेळ काढत प्रकल्पग्रस्तांची दिशाभुल करीत असतात. दि. 19 जुन रोजी सकाळी 10.00 वा. शेतकऱ्याच्या न्याय मागण्यांसाठी कर्नाटक एम्टा च्या विरोधात प्रतिभा धानोरकर यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले.

यावेळी अनेक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याच्या आंदोलनात सहभाग होता. यावेळी चर्चेसाठी आलेल्या अधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासंदर्भात माहिती नसल्याने अधिकाऱ्यांच्या विरोधात प्रकल्पग्रस्तांना चिड आली व आमच्या न्याय मागण्यासंदर्भात आपण पळ वाट शोधत असल्याची भावना शेतकरी व प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केली. यावेळी अधिकाऱ्यांच्या या दुटप्पी भुमीकेमुळे प्रकल्पग्रस्तांसोबत धक्काबुक्की देखील झाली. या आंदोलनासंदर्भात खा. प्रतिभा धानोरकर म्हणाल्या कि, कर्नाटक एम्टा खदानीतील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी त्रस्त आहेत. सध्या कंपनीला परवानगी नसतांना देखील उत्खनन करीत आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पुर्ण होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या व प्रकल्पग्रस्तांच्या प्रष्नांकरीता लढत राहणार असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकरांसह वन प्रशासन अधिकारी श्री. खाडे व कर्नाटक एम्टाचे अधिकारी व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याची उपस्थिती होती.