Friday, January 17, 2025
HomePoliticalजेव्हा जेव्हा मी जिंकलो, पक्ष जिंकला, पक्षाचे विचार जिंकले :हा लोकशाहीचा विजय...

जेव्हा जेव्हा मी जिंकलो, पक्ष जिंकला, पक्षाचे विचार जिंकले :हा लोकशाहीचा विजय व संविधानाचा सन्मान होता – हंसराज अहीर

Whenever I won, the party won, the ideas of the party won: It was the victory of democracy and the honor of the Constitution – Hansraj Ahir

चंद्रपूर :- मी चंद्रपूर लोकसभा 1996 मध्ये पहिल्यांदा जिंकलो. 1991 च्या निवडणुकीमध्ये भाजपा तिसऱ्या क्रमांकावर होता त्यानंतर एकूण 4 वेळा जिंकलो
माझ्या मूळ जातीची फक्त 150 परिवार असतील तरी पण पक्षाने मला वारंवार उमेदवारी दिली, 4 वेळा कार्यकर्त्यांनी व जनतेने विजयी केले. ही माझ्या पक्षाची व चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील जनतेची महानता आहे.
मी लोकसभा जिंकलो तेव्हा पक्ष जिंकला, पक्षाचे विचार जिंकले, लोकशाहीचा विजय ठरत होता, संविधानाचा सन्मान होत होता. निवडणूक ही विचारांची असते. पुढेही लोकशाहीला हेच अभिप्रेत आहे. मी चारित्र्य सांभाळले, जनतेच्या मताचा आदर केला.
ही निवडणूक सुद्धा पक्ष जिंकेल. चंद्रपूर भाजपचा गड आहे. दुर्देवाने मागची निवडणूक आम्ही जिंकलो नसलो तरी आमची एकता, एकाग्रता पक्ष बांधणीतून आम्ही विजयाकडे चाललो आहे.
मिशन महाविजय-2024 महाविजय संकल्प 400 पार, प्रधानमंत्री मोदी जी 3 री बार यात चंद्रपूर राहिलच. आम्ही लढू, आम्ही जिंकू असे भाकीत माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी व्यक्त केले.

चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभा क्षेत्रातून लढण्यास इच्छुक असून पक्षाने संधी दिली तर अवश्य जिंकू असा विश्वास हंसराज अहिर यांनी व्यक्त केला.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular