Thursday, September 12, 2024
spot_img
spot_img
Homeक्रीडा व मनोरंजनआपलं Facebook सुरू होत आहे काय ?

आपलं Facebook सुरू होत आहे काय ?

What happened to your Facebook account?  Is it starting?

जगभरातील फेसबुक आपोआप लॉगऑऊट झाले असल्याची तक्रार जगभरात सुरू आहे. संपूर्ण फेसबुक सर्व्हर डाऊन Facebook Server Down झाले आहे. याबाबत अजून कोणतीही औपचारिक अपडेट फेसबुक व्यवस्थापकांकडून आली नाही. इंस्टाग्राम देखील डाऊन असल्याची माहिती मिळत आहे.

फेसबुकला पुन्हा लॉगइन केल्यानंतर पासवर्ड नाकारल्या जात आहे. परंतु आपला पासवर्ड चुकीचा नाही. फेसबुकच्या होम पेजवर जाण्याऐवजी Facebook तुम्हाला आपोआप बाहेर काढेल.

तुमचा लॉग इन कालबाह्य झाला आहे असा Error एरर मेसेज तुम्हाला दिसेल आणि तुम्ही परत लॉग इन Log In करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुमची क्रेडेन्शियल्स नाकारली जातील.

लॉगआऊट होण्याचा प्रकार फेसबुकसह इंस्टाग्राम तसेच मेसेंजरवरही होत आहे. मात्र तुमचा पासवर्ड बदलण्याची गरज नाही. सध्या फक्त सेवा खंडीत आहेत. फेसबुक यावर अधिकृत उत्तर देणार आहे.

फेसबुक, इंस्टाग्राम आणि थ्रेड्ससह मेटा-मालकीचे प्लॅटफॉर्म सध्या तांत्रिक समस्यांना तोंड देत आहेत. सोशल मीडिया वापरकर्ते विविध समस्यांची तक्रार करत आहेत, जसे की त्यांच्या Facebook खात्यातून लॉगआउट झाल्यानंतर, परत लॉगइन होत नाही आहे. त्याचप्रमाणे, Instagram वापरकर्त्यांना त्यांचे फीड रिफ्रेश करण्यात अडचणी येत आहेत.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular