WCL’s powerful blasting caused several houses to crack MLA Subhash Dhote’s advice to WCL administration to help the affected and take effective measures
चंद्रपूर :- वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रात Wcl Ballarpur Area कोळसा उत्खननासाठी घडवून आणत असलेल्या शक्तिशाली ब्लास्टींगने वेकोली परिसरातील अनेक घरांना तडे गेल्याने चांगल्या बांधलेल्या घरांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. यासंदर्भात वेकोलिकडे गावकऱ्यांनी अनेकदा तक्रारी केल्या. परंतु शक्तिशाली ब्लास्टिंगवर वेकोलीने अजूनपर्यंत कोणतीही उपाययोजना केली नाही.
राजुरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात भूमिगत व खुल्या कोळसा खाणी आहेत. सास्ती, धोपटाळा, गोवरी, पोवणी, गोयेगाव, अंतरगाव, साखरी, चिंचोली, हीरापुर परिसरात वेकोलीच्या कोळसा खाणींचे जाळे विणले आहे. कोळसा उत्खननासाठी वेकोलीत वेळी अवेळी शक्तिशाली ब्लास्टिंग केली जाते. त्यामुळे वेकोली परिसरातील गावांना ब्लास्टिंगचा मोठा फटाका सहन करावा लागत असून सुसज्ज दिसणाऱ्या इमारतींना अल्पावधीतच तडे गेल्याने अनेक घरांच्या भिंती कोसळल्याच्या तसेच शेतातील बोअरवेल खचल्याच्या घटना घडत आहेत.
कोळसा खाणीतील ब्लास्टींगची तीव्रता वाढविल्याने कोळसा खान लगत असलेल्या गोवरी गावालगत कोळसा खाण असल्याने शक्तिशाली ब्लास्टिंगचा मोठा फटाका गावकऱ्यांना बसला आहे. यासंदर्भात गावकरी व शेतकऱ्यांनी वेकोलिकडे तक्रारी केल्या. परंतु वेकोली प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करीत असल्यामुळे गोवरी आणि परिसरातील प्रभाकर जुनघरी, दिपक पिंपळकर यासह अनेक नुकसानग्रस्त नागरिकांनी आमदार सुभाष धोटे MLA Subhash Dhote यांची भेट घेऊन ही संपूर्ण हकिकत त्यांना अवगत करून दिली.
ह्याम (NHAI) अंतर्गत सुरू असलेल्या राजुरा ते वनसडी आणि पवनी ते चंद्रपूर राज्यमार्गाच्या गोवरी येथील अर्धवट पुलाची पाहणी करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आमदार सुभाष धोटे यांनी नुकतीच गोवरी येथे घेतली होती. यावेळी स्थानिक नागरिकांनी गोवरी आणि परिसरात वेकोलीच्या शक्तीशाली ब्लाँस्टींगमुळे येथील घरांना हादरे बसणे, तडे जाणे तसेच मोठय़ा प्रमाणात नुकसान होत असल्याच्या तक्रारी केल्या. यासंदर्भात सविस्तर माहिती घेऊन आ. सुभाष धोटे यांनी वेकोली बल्लारपूर क्षेत्राचे मुख्यमहाप्रबंधक एलियास हुसेन यांच्याशी संपर्क साधून नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीने मदत द्यावी या परिसरात यापुढे नागरिकांचे नुकसान होणार नाही यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. तसेच वेकोलीचे सीएमडी जे. पी. द्विवेदी यांच्याकडे निवेदन देऊन नुकसानग्रस्तांना तातडीने आवश्यक मदत मिळवून देण्याची तसेच भविष्यात वेकोलीच्या ब्लाँस्टींगमुळे स्थानिक नागरिकांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी केली.