Saturday, April 20, 2024
HomeCrimeचौकीदारच निघाला चोर : रामनगर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने केले 26...

चौकीदारच निघाला चोर : रामनगर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने केले 26 लाख जप्त

watchman turned out to be a thief
26 lakh seized in a joint operation of Ramnagar Police and Local Crime Branch

चंद्रपूर :- शहरातील सिंधी कॉलोनीतील व्यावसायिकाच्या घरी 26 लाख रुपये चोरी प्रकरणाचा रामनगर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेने कौशल्यपूर्ण तपास करीत व्यावसायिकाच्या घरच्या चौकीदाराला अटक केली आणि चोरी गेलेले 26 लाख रुपये व इतर साहित्य असे एकूण 26,06,700 मुद्देमालासह जप्त करण्यात आले. Burglary Crime

खुशाल भागचंद अडवानी, रा. सिंदी कॉलनी रामनगर, चंद्रपुर हे दिनांक 15 मार्च 2024 रोजी परिवारासह विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथे नातेवाईकाचे घरी कार्यक्रमाकरीता घराचे समोरील दरवाज्याला लॉक करून गेले. नातेवाईकाच्या घरचा कार्यक्रम पुर्ण करून दिनांक 18 मार्च रोजी घरी परतले. त्यांची बॅग ते वडीलाचे बेडरूमध्ये ठेवण्याकरीता गेले असता, वडीलाचे बेड रूममधील खिडकीचे ग्रिल तुटलेले दिसले. तेव्हा बेड रूमधील आलमारीची पाहणी केली असता, आलमारीतील रोख रक्कम 26,00,000/- रूपये (सव्वीस लाख रूपये) चोरी झाल्याचे आढळून आले. अशी तक्रार पोलीस स्टेशन, रामनगर येथे करण्यात आली यावरून रामनगर पोलीस ठाण्यात अप.क्र. ३००/२०२४ कलम ४५४, ४५७, ३८० भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेण्यात आला. Ramnagar Police Station

गुन्हयाची घरफोडी ही मोठ्या रक्कमेची व अतिशय गंभीर स्वरूपी असल्याने पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर तसेच गुन्हे शोध पथक, रामनगर पोलीस स्टेशन येथील अधिकारी व कर्मचारी हे घटनास्थळी रवाना होवुन घटनास्थळाचे आजु-बाजुच्या परिसरातील सी.सी.टि.व्हि. फुटेज तपासून गोपनिय बातमिदाराचे माहीती वरून अतिशय परिश्रम घेवुन, तांत्रिक पध्दतीने कौशल्यपुर्ण तपास करून फिर्यादीचे घरी चौकीदार म्हणुन काम करणारा विकास महादेव गोंधळी, रा. तोहगांव, ता. गोंडपिपरी, चंद्रपुर, ह.मु. भागचंद अडवाणी यांचे घरी सिंधी कॉलनी चंद्रपुर यास ताब्यात घेवुन त्यास विश्वासात घेवुन, पोलीसी खाक्या दाखवीत विचारपुस केली असता त्यानी गुन्हयाची कबुली दिली. Chandrapur LCB & Ramnagar Police’s Combine operation

त्यावरून आरोपीला अटक करून गुन्हयात चोरीस गेलेले रोख रक्कम 26,00,000/- रूपये व गुन्हयात वापरलेले साहीत्य ईलेक्ट्रीक कटर मशिन, एक C.P. PLUS कंपनीचा डि. व्ही.आर., एक लोखंडी छन्नी, एक लाल रंगाची पकड असलेले कटर व ईलेक्ट्रीक अॅक्टेनशन बोर्ड असा एकुण नगदी 26,06,700/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर आणि रामनगर पोलीस स्टेशन च्या गुन्हे शोध पथकाने संयुक्त कारवाई करीत केली आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular