watch and bike thief was taken into custody by the db team of Chandrapur city police

चंद्रपूर :- शहरातील डॉ. अल्लूरवार हॉस्पिटल मधील रेडीओ टेक्नॉलॉजीस्ट यांची रेस्टरूम मधून स्टँड घड्याळ व राजकला टॉकीज जवळून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला शहर पोलीसांच्या गुन्हे अन्वेषण पथकाने मोठ्या शिताफीने ताब्यात घेत चोरलेली घड्याळ व मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे.
दुर्गापूर येथील सुरेश लष्कर हे दिनांक 24 डिसेंबर रोजी सिनेमा पाहण्यासाठी शहरातील राजकला टॉकीज येथे सिनेमा बघायला गेले असता त्यांची होंडा शाईन मोटरसायकल एम.एच. 34 सी. बी. 9288 अज्ञात चोरांनी चोरल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.
तर दिनांक 26 डिसेंबर रोजी डॉ अल्लूरवार येथील रेडीओ टेक्नॉलॉजीस्ट सागर दामिया ड्यूटी करून रात्रो रेस्ट रूम मध्ये आराम करीत असतांना त्यांची घड्याळ चोरी झाल्याची तक्रार चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.
दोन्ही गुन्ह्यातील गांभीर्य लक्षात घेत शहर पोलीसांच्या गुहे शोध पथकाने घटनास्थळी दाखल होत सीसीटीव्ही कॅमेरांची फुटेज तपासून आरोपी इकबाल आशिकहुसेन पंढरपूरवाला, वय 63 वर्ष, रा. घुटकाळा, चंद्रपूर याला ताब्यात घेत चोरलेली घड्याळ व मोटरसायकल असा एकूण 36,000/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागिय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांचे मार्गदर्शनाखाली चंद्रपुर शहर पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपुत, सपोनि. मंगेश भोंगाडे, पोउपनि शरिफ शेख, स. फौ. विलास निकोडे, पो.हवा. महेंद्र बेसरकर, जयंता चुनारकर, संतोष पंडीत, पोहवा. सचिन बोरकर, निलेश मुळे, भावना रामटेके, चेतन गज्जलवार, इम्रान खान, संतोष कावळे, दिलीप कुसराम, ईरशाद शेख, रूपेश रणदिवे यांनी केली आहे.
गुन्ह्यातील पुढील तपास पोउपनि. शरिफ शेख, स. फौ. विलास निकोडे करीत आहे.