Thursday, February 22, 2024
Homeआमदारव्हॉलीबॉल स्पर्धा खेडाळूंमध्ये नवचैतन्य निर्माण करेल - आमदार सुधाकर अडबाले ; चंद्रपुरात...

व्हॉलीबॉल स्पर्धा खेडाळूंमध्ये नवचैतन्य निर्माण करेल – आमदार सुधाकर अडबाले ; चंद्रपुरात २५ व्या युथ राज्यस्तरीय अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन

Volleyball tournament will create new spirit among Player’s – MLA Sudhakar Adbale;  Inauguration of 25th Youth State Level Championship Volleyball Tournament at Chandrapur

चंद्रपूर : ऑनलाईन युगात मैदानी खेळ होणे अत्यंत गरजेचे आहे. चंद्रपुरात होत असलेली २५ वी युथ राज्यस्तरीय अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धा जिल्ह्यातील खेडाळूंमध्ये नवचैतन्य निर्माण करेल, असा विश्वास आमदार सुधाकर अडबाले Mla Sudhakar Adbale यांनी व्यक्त केला.

मथुरा व्हॉलीबॉल स्पोर्टींग क्लब तर्फे आयोजित महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटना व चंद्रपूर जिल्हा व्हॉलीबॉल संघटना यांच्या मान्यतेने रवींद्रनाथ टागोर प्राथ. शाळेचे मैदान, विठ्ठल मंदिर वॉर्ड, चंद्रपूर येथे २५ वी युथ राज्यस्तरीय अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धा २०२३ (मुले व मुली) या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून आमदार अडबाले बोलत होते.

यावेळी अध्यक्षस्थानी आमदार सुभाष धोटे तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रतिभा धानोरकर, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश तिवारी, माजी महापौर संगीता अमृतकर, डॉ. अनिल शिंदे, प्रा. रवी झाडे, प्रशांत दानव, क्लबचे अध्यक्ष अभय बद्दलवार, सचिव प्रकाश मस्के, पुरुषोत्तम पंत आदींची उपस्थिती होती.

या स्पर्धेत राज्यातील विविध विभागातील संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेचे उद्घाटन करताना आमदार अडबाले म्हणाले की, व्हॉलीबॉल हा एक उत्तम खेळ आहे. हा खेळ खेळल्याने खेळाडूंमध्ये सहकार्य, संघभावना, संयम, लवचिकता यासारख्या गुणांचा विकास होतो. ऑनलाईन युगात शारीरिक आरोग्यासाठी मैदानी खेळांचे महत्त्व वाढले आहे. चंद्रपुरात होत असलेली ही स्पर्धा जिल्ह्यातील खेडाळूंसाठी एक चांगली संधी आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना मी शुभेच्छा देतो.

यावेळी आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर यांनीही खेडाळूंना शुभेच्छा दिल्या. उदघाटन समारंभाचे संचालन प्रफुल पुलगमकर यांनी केले. या स्पर्धा २४ ते २६ नोव्हेंबरपर्यंत चालेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular