Thursday, September 12, 2024
spot_img
spot_img
Homeमहाराष्ट्र राज्यविदर्भ राज्य निर्मितीसाठी गडचिरोलीत विदर्भ निर्माण संकल्प प्रचार यात्रा

विदर्भ राज्य निर्मितीसाठी गडचिरोलीत विदर्भ निर्माण संकल्प प्रचार यात्रा

Vidarbha Nirman Sankalp Prachar Yatra in Gadchiroli for creation of Vidarbha State from VRAS.                                                                  चंदपूर :- विदर्भ मिळवू औदा असा संकल्प करीत विदर्भ राज्य आंदोलन समितीने आंदोलन अधिक आक्रमक करण्याचा निर्णय घेतला आहे. याच अंतर्गत विदर्भ आंदोलनाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विदर्भ निर्माण संकल्प यात्रा काढण्यात येणार असून, गडचिरोली जिल्ह्यात एकाच दिवशी दोन ठिकाणाहून ही यात्रा निघणार आहे, अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे संयोजक ॲड. वामन चटप यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

पहिली प्रचार यात्रा १ डिसेंबररोजी सकाळी ११ वाजता अहेरीवरून निघणार आहे. अहेरी, ताडगाव, भामरागड येथे येऊन मुक्काम करेल, २ डिसेंबर रोजी भामरागड, एटापल्ली, मुलचेरा आणि घोट अशी पोहोचेल. ३ डिसेंबर रोजी घोटवरून चामोर्शी मार्गे गडचिरोली येथे पोहोचेल. तर दुसरी संकल्प प्रचार यात्रा १ डिसेंबरलाच कोरची येथून निघणार असून, पहिला मुक्काम पुराडा येथे होणार आहे. २ डिसेंबर रोजी पुराडा,कुरखेडा, वडसा, आरमोरी येथे येऊन आरमोरीत मुक्काम होईल. ३ डिसेंबर रोजी आरमोरी, धानोरा व्हाया गडचिरोली येथे पोहोचेल. दुपारी ३ वाजता दोन्ही संकल्प यात्रा गडचिरोली पोहोचल्यानंतर येथे जाहीर सभा होणार आहे. या संकल्प प्रचार यात्रेचे नेतृत्व अरुण केदार, मुकेश मासुरकर, डॉ. रमेशकुमार गजभिये, राजेंद्रसिंह ठाकूर, घिसू पाटील खुणे, अरुण मुनघाटे, जुम्मन शेख, राजकुमार शेंडे, शालिक नाकाडे करणार आहेत. Vidarbha Nirman Sankalp Prachar Yatra in Gadchiroli for creation of Vidarbha State from VRAS

गडचिरोलीतील जाहीर सभेला ज्येष्ठ पत्रकार तथा शेतकरी नेते प्रकाश पोहरे, डॉ. श्रीनिवास खांदेवाले उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याची माहिती ॲड. वामन चटप यांनी दिली आहे. पत्रकार परिषदेला किशोर दहेकर, मारोती बोथले, मुन्ना आवडे, रमेश नळे आदी उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular