Victory of Pratibha Dhanorkar is victory of common people: MLA Subhash Dhote.
चंद्रपूर :- चंद्रपूर १३ लोकसभा मतदार संघाच्या इंडिया तथा महाविकास आघाडी समर्थित भारतीय राष्ट्रीय कांग्रेसच्या अधिकृत उमेदवार श्रीमती प्रतिभाताई बाळूभाऊ धानोरकर यांच्या रूपाने सर्वसामान्य जनतेचा विजय आहे.
काँग्रेसच्या संविधानिक लोकशाही मार्गाने केलेल्या विविध विकासकामांवर आणि सामाजिक सलोख्याच्या धोरणांवरील जनतेच्या विश्वासाचा हा विजय आहे अशी प्रतिक्रिया चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे यांची आज जाहीर झालेल्या चंद्रपूर- १३ लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिली आहे.
तर महाराष्ट्र आणि देशात सुद्धा काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या उमेदवारांना जनतेने भरभरून प्रेम आणि प्रतिसाद दिला आहे. संपूर्ण देशात इंडिया आघाडीच्या बाजुने आणि सत्ता परिवर्तन घडवून आणण्यासाठी जनतेने खटाखट मतदान केले आहे.
मायबाप मतदार राजाचे, काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच सर्व विजयी उमेदवारांचे मनापासून आभार आणि अभिनंदन. येणाऱ्या काळात इंडिया तथा महाविकास आघाडी अधिक मजबूत होऊन सत्तेचा केंद्र बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.