Sunday, March 23, 2025
HomeLoksabha Electionमाझ्या विजयाचे खरे शिलेदार हे कॉग्रेस पक्षाचे कार्यकर्ते - खा. प्रतिभा धानोरकर

माझ्या विजयाचे खरे शिलेदार हे कॉग्रेस पक्षाचे कार्यकर्ते – खा. प्रतिभा धानोरकर

My victory is dedicated to Congress workers – MP Pratibha Dhanorkar
Newly appointed MPs felicitated by Chandrapur District Congress Committee

चंद्रपूर :- चंद्रपुर जिल्हा कॉग्रेस कमेटीतर्फे आज जिजाऊ लॉन येथे चंद्रपुर वणी आर्णी क्षेत्राच्या नवनियुक्त खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar व गडचिरोलीचे नवनियुक्त खासदार डॉ. नामदेव किरसान MP Dr. Namdeo Kirsan यां नवनियुक्त खासदारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. Newly appointed MPs felicitated by Chandrapur District Congress Committee

जिजाऊ लॉन येथे आज चंद्रपुर कॉग्रेस कमेटीच्या वतीने सत्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. हा सत्कार सोहळा स्विकारतानां खा. प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की कुठलाही नेता हा कार्यकर्त्या शिवाय मोठा होवु शकत नाही. कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असुन माझ्या निवडणुकीत हा कणा मजबुत असल्याने मला हा विजय मिळवता आला. माझ्या या विजयाचे खरे शिलेदार हे कॉग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असल्याने माझा हा आजचा सत्कार सोहळा कार्यकर्त्यांना समर्पित करित आहे.

भविष्यात देखिल येणाऱ्या निवणुकांमध्ये कार्यकर्त्यानी पक्ष संघटनेसाठी जोमाने काम करावे असे आवाहन देखिल या वेळी खा. प्रतिभा धानोरकर यांनी केले.

त्यासोबतच मी सदैव कॉग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या पाठीषी खंबिरपणे उभे राहणार असल्याचे देखिल सांगितले. या निवडणुकीत पक्षाचे संघटन आणि ताकद माझ्या पाठीशी असल्याने ही निवडणुक माझ्यासाठी सोपी झाली असे देखिल मत खा. धानोरकर यांनी व्यक्त केले.

या प्रसंगी अन्य मान्यवरांनी देखिल आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी मंचावर गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार डॉ. नामदेव किरसान, काँग्रेस जिल्हाध्यक्ष आ. सुभाष धोटे, आ. अभिजित वंजारी, आ. सुधाकर अडबाले, मुजिब पठाण, आमदार देवराव भांडेकर, आ. अविनाश वारजुरकर या सह अनेक पदाधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular