
गोवंश तस्करीचे वाहन जात असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे विरुर पोलीस स्टेशन द्वारे लक्कडकोट मुख्य महामार्गावर आज दिनांक 12 ऑक्टोबर रोजी नाकाबंदी करण्यात आली, यादरम्यान MH 33 T 3941 व MH 34 BG 3694 या दोन पीक अप वाहनांची तापसणी केली असता 20 जनावरे कोंबून कत्तलीसाठी नेत असल्याचे निदर्शनास आले यावरून एका वाहनचालकाला प्राणी सरंक्षण कायद्या अंतर्गत। अटक करण्यात आली तर दुसरा वाहन चालक पळून जाण्यात यशस्वी झाला, दरम्यान विरुर पोलिसांनी गोवंशांची सुटका करीत एकूण 20 गोवंश अंदाजे किंमत 1 लाख 20 हजार रुपये तसेच दोन पीकअप वाहने अंदाजे किंमत 8 लाख रुपये असा एकूण 9 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. Two Vehicles of cattle smugglers seized for slaughter; Virur police action
सदर कारवाई विरुर पोलीस स्टेशन चे ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांच्या नेतृत्वाखाली सपोनि अजय मडावी, पोहवा सुनील मेश्राम, विजय तलांडे, प्रमोद मिलमीले, रामदास निलेवार, प्रवीण जुनघरे, गृहरक्षक इलियास शेख व पतृ ठाकरे यांनी केली.