VBA supports independent candidate Raju Zode
चंद्रपूर :- वंचित बहुजन आघाडी VBA च्या माध्यमातून चंद्रपूर विधानसभा क्षेत्र 71 मधून स्नेहल रामटेके यांनी नामांकन दाखल केले होते परंतु काही त्रुटी आढळल्याने त्यांचे नामांकन रद्द झाले दरम्यान चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात वंचित ला उमेदवार नसल्याने वंचित ने राजू झोडे Raju Zode यांना समर्थन जाहीर करीत वंचीत च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी झोडे यांची प्रचार यंत्रणा राबवावी असे निर्देश प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी दिले आहेत. Vanchit Bahujan Aaghadi supports independent candidate Raju Zode at Chandrapur assembly
चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाकडून राजू झोडे यांना उमेदवारी जाहीर होणार असे चित्र असताना चंद्रपूरची उमेदवारी प्रवीण पडवेकर यांना जाहीर झाली त्यानंतर राजू झोडे नामांकन परत घेतील असे मतदारांना वाटले परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहाणे आपण अपक्ष निवडणूक लढाणार म्हणत झोडे अपक्ष रिंगणात उतरले. Political News
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात राजू झोडे यांचा मोठा जनसंपर्क आहे, या क्षेत्रात मोठं – मोठे आंदोलने त्यांनी केले, सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी बरीच आंदोलन केलेली आहेंत. याउलत चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात त्यांचा दांडगा जनसंपर्क असून भरीव कार्य नाही परंतु वंचित ने दिलेल्या समर्थनामुळे राजू झोडे यांचे मोठ्या प्रमाणात प्राबल्य वाढणार असल्याची मतदारात चर्चा आहे.