Saturday, April 26, 2025
HomePoliticalवंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर संपन्न

वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर संपन्न

Vanchit Bahujan Aghadi officials training camp concluded

चंद्रपूर :- वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर जिल्हा अंतर्गत जिल्हा, तालुका व शहर पदाधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रम जेष्ठ नागरिक संघ चंद्रपूर येथे 14 तारखेला ला संपन्न झाला. सदर प्रशिक्षण कार्यक्रम काही दिवसानंतर होऊ घातलेला लोकसभा निवडणुकी संदर्भात होता.

या कार्यक्रमात जिल्हा निरीक्षक राजेश बोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत, मुख्य प्रशिक्षक वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष एड. सर्वजीत बनसोडे, राज्य प्रवक्ते एड. प्रियदर्शि तेलंग यांनी जिल्ह्यातील तालुक्यातील शहरातील शेकडो पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना मतदारसंघात पक्षाची संघटनात्मक बांधणी, पक्षांच्या ध्येयधोरणाचा सर्व वंचित घटकापर्यंत प्रचार आणि प्रसार कसा करायचा, निवडणूक प्रचार करताना मतदार संपर्क, मीडियाद्वारे प्रचार याबाबत सखोल माहिती दिली. तसेच जिल्ह्यातील ज्वलंत प्रश्नावर सुद्धा माहिती देण्यात आली.

यावेळी पंधराही तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी आपल्या तालुक्यातील कार्यांचा आढावा आणि समस्या विषयी माहिती दिली. प्रशिक्षण कार्यक्रमामुळे संपूर्ण जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.

सदर कार्यक्रमांमध्ये आगामी दिवसांमध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुका संदर्भात रणनीती निश्चित करण्यात आली.

यवेळी उपस्थित पंधराही तालुक्यातील पदाधिकारी तसेच जिल्हा अध्यक्ष प्रा.सोमाजी गोंडाने जिल्हा कार्यध्यक्ष जयदीप खोब्रागडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष कविता गौरकार, महानगर अध्यक्ष बंडूभाऊ ठेंगरे, महानगर कार्याध्यक्ष सतीश खोब्रागडे,महानगर महिला अध्यक्षा तनुजा रायपुरे, युवा जिलाध्यक्ष शुभम मंडपे, वर्धा जिल्हा प्रभारी बंडू नगराळे आदी उपस्थित होते. या प्रशिक्षण शिबिराचे संचालन जयदीप खोब्रागडे, प्रास्ताविक ऍड. अक्षय लोहकरे जिल्हा महासचिव, आभार प्रा.सोमाजी गोंडाने सर यांनी केले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular