Urgently help drought-affected farmers: MLA Subhash Dhote’s instructions to Collectors and Tehsildars.
चंद्रपूर :- राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुग, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यात अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे फार मोठे नुकसान झाले अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरवळुन गेल्या.
याबाबत महसुल विभाग, कुषी विभाग व ग्रामपंचायत सचिव याच्यां मार्फतीने पंचनामे पूर्ण करून तहसिल कार्यालयाकडे अहवाल सादर झाले मात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापी नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही.
शेतकऱ्यांची सन 2024 – 25 मधील पेरणीची सुरूवात होत आहे. सततची नापिकी, दुष्काळ परिस्थिती इत्यादीवर मातकरून शेतकरी विविध पिकांचे उत्पादन घेत असतांना शेतपिकाना हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे.
याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने कर्जबाजारीपणाला कंठाळुन अनेक शेतकरी आत्महत्येसारखे विचार मनात आणुन काही शेतकरी आत्महत्या सुध्दा करीत आहेत.
पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना बि बियाने खरेदीकरीता अडचण होत असल्याने सन 2022 – 23 व 2023 – 24 मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडुन नुकसान भरपाईचा मोबदला मिळणेसाठी वारवार मागणी केली जात आहे.
मात्र तालुकास्तरावर संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम वळती करण्यास दिरंगाई होत असल्याचे दिसुन येत आहे. तसेच केवायसी आणि विशिष्ट क्रमांक चे कारण दाखवून शेतकर्यांना वारंवार तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागतात.
त्यामुळे परिसरातील शेतकरी बाधवांमध्ये शासकीय यंत्रणेच्या कार्यपध्दती विषयी असंतोष निर्माण झालेला आहे.
एकुणच निसर्गाच्या अवकृपेने अन्नदाते शेतकरी बांधव अस्मानी संकटात सापडले आहेत तर अतिशय संवेदनशील बाबीची दखल प्रशासकीय स्तरावर घेतल्या न गेल्याने सुलतानी संकटात ते भरडल्या जात आहेत.
त्यामुळे माणुसकीच्या नात्याने या गंभीर समस्येची दखल घेऊन सर्व दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना तातडीने नुकसान भरपाई रक्कम त्यांच्या खात्यात जमा करा अशा सूचना आमदार सुभाष धोटे MLA Subhash Dhote यांनी मा. जिल्हाधिकारी आणि राजुरा, कोरपना, जिवती, गोंडपिपरी च्या तहसीलदारांना निवेदनाद्वारे केल्या आहेत.
अन्यथा शेतकरी बांधवांकडुन तालुका प्रशासनाच्या विरोधात तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुद्धा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.