Untimely death of journalist Rajkumar Junghare
कोठारी :- विविध प्रादेशिक वृत्तपत्रात लेखन करणारे कोठारी येथील राजकुमार जुनघरे यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ४८ वर्षात निधन झाले. त्यांच्या निधनाने कोठारी परिसरातील वृत्तपत्र क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून अनेकांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत.
मागील वीस वर्षांपासून प्रादेशिक वृत्तपत्रातून जनसामान्यांच्या समस्या, वेदना तसेच सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक लेखन करून शासन दरबारी मांडण्याचा अविरत प्रयत्न केला. निर्भीड लेखन शैलीने अनेकांच्या गळ्यातील ताईत बनले होते. मात्र अत्यंत कमी वयात त्यांचे अकाली जाणे अनेकांच्या मनात खदखद निर्माण करून गेली आहे.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत परिसरातील नागरिकांना आपल्या बातम्यांच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न केला होता.
त्यांच्या निधनाने कोठारी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले असा आप्तपरिवार आहे.
त्यांचे पार्थिवावर कोठारी स्मशानभूमीत अग्नी देण्यात येऊन अंतिम संस्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या चाहत्यांनी हजेरी लावली होती.