Unique method of smuggling liquor through a four-wheeler
चंद्रपूर :- विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आणि दारू तस्करीचे प्रमाण वाढताना दिसत आहेत, अश्या एका टाटा येस झेनॉन चारचाकी वाहनातून अवैध दारू तस्करीचा LCB स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर ने पर्दाफाश केला. यात 88240 रुपयांची देशी दारू व एका टाटा येस झेनॉन चारचाकी वाहन असा एकूण 5,88,240 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. Unique method of smuggling liquor through a four-wheeler
दिनांक 23 ऑक्टोबर 2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी रामनगर पोलीस ठाणे हददीत पेट्रोलींग करीत असतांना खबर मिळाली कि एका टाटा येस झेनोन मालवाहू गाडी मधे अवैध्यरित्या दारु वाहणामधे टाकून विक्री करिता नेत आहे,
माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर मार्गे चंद्रपूर कडे येणाऱ्या रोड वर वरोरा नाका जवळ नाकाबंदी केली असता टाटा येस झेनन वाहनाची पाहणी केली असता वाहनाच्या डाल्यामधे कप्पा तयार करून त्यामधे लपवून देशी दारूच्या प्रत्येकी 90 ml 2000 नीपां किंमत 70000 रुपये व विदेशीं दारू 180Ml 96 निपा किंमत 18280 रुपये तसेच टाटा झेनोन zenon मालवाहू गाडी किंमत 5,00,000 रुपये असा एकूण 5,88,240 रुपयांचा मुद्देमाल कारवाई करून जप्त करण्यात आला. Chandrapur Local Crime Branch busts
आरोपी विरुध्द रामनगर पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक /2024 कलम 65 अ (ई) 83 म.दा.का.अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. Chandrapur Crime
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात अति. पोलीस अधीक्षक प्रमोद चौगुले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कोंडावार, सपोनी दीपक कांक्रेडवार, पोउपनी संतोष निंभोरकर, पो हवा. नितेश महात्मे, चेतन गज्जलवार, पोआ किशोर वाकाटे, अमोल सावे, प्रफुल गारघटे, प्रमोद कोटणाके, प्रसाद गुलदांदे आदी सर्व स्थानिक गुन्हे शाखा,चंद्रपूर यांनी केली.