Unidentified woman found sick near Mahakali temple; Appeal of Chandrapur City Police
चंद्रपूर :- चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील महाकाली मंदिर परिसरात एक अनोळखी महिला दिनांक 29 फेब्रुवारी 2024 आजारी गंभीर अवस्थेत आढळून आली, सदर महिलेला शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या महाकाली पोलीस चौकी च्या पोलिसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले.

सदर महिलेची प्रकृती शासकीय रुग्णालयात 8 दिवसांच्या उपचारा नंतर आता बरी झाली असून सध्या उपचार सुरू आहे. महिला वेडसर अवस्थेत असून सारखी बळबळ करत असून स्वतःचे नाव, पत्ता सांगत नाही, करीता
सदर महिलेची ओळख पटविण्यासाठी चंद्रपूर शहर पोलीसांनी आवाहन केले आहे.
महिलेचे वर्णन
सदर महिला अंदाजे वय 50 वर्ष असून अंगावर कथा-हिरवा- पिवळा रंगाची साळी व कथा रंगाचा ब्लाऊज असे वस्त्र परिधान केलेली आहे, महिलेचा चेहरा लांब, रंग सावळा, नाक सरळ, नाकात बेसर, उंची फूट 4,3 इंच, लांब काळे केस अशी आहे.
सदर महिलेच्या उजव्या डोळ्याला मार लागल्याने सुजलेल्या अवस्थेत आहे.
सदर अनोळखी महिलेची ओळख पटल्यास चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन, चंद्रपूर पोलीस ठाण्यात चे पोलीस निरीक्षक, पोउपनी विजय मुके, 9923401065, पोहवा रमेश मेश्राम 8459107310, पो.अं. मनोज कोहचाळे यांनी केले आहे.