Monday, March 17, 2025
HomeBussinessशासकीय जागेवर अवैद्य अतिक्रमण, मनपाची मुक सहमती

शासकीय जागेवर अवैद्य अतिक्रमण, मनपाची मुक सहमती

Unauthorized encroachment on government land, no consent of Chandrapur municipality for construction:
Information about Bahujan Hitay, Bahujan Sukhay President Chikte in the press conference

चंद्रपूर :- चंद्रपूर शहरातील मौजा चांदा रैयतवारी येथील सर्वे क्रमांक 13/3 ही जागा शासकीय राजस्व विभागाची आहे. या जागेवर सध्या अवैध बांधकाम चालु असुन अतिक्रमण दाखविण्याच्या उद्देशाने दोन महीन्यापासून जागेवर पक्के घराचे बांधकाम शुरू केले आहे. यासंदर्भात तत्काळ अतिक्रमण हटवावे व टैक्स घेणार्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर गुन्दा दाखल करन्याची मागणी बहुजन हिताय, बहुजन सुखाय चे अध्यक्ष सुरज चिकटे यांनी पत्रपरीषदेत केली आहे.

मौजा चांदा रयतवारी त.सा.क्र. 10 येथील सर्वे क्रमांक 13/3 ही जागा राजस्व विभागाची आहे. ही जागा अशासकीय संस्थेला किंवा शासकीय कर्मचारी यांना 100 वर्षाच्या लीजवर निवास अटी वर शासकीय दराप्रमाणे शुल्क घेऊन देता येते. उक्त जागेवर राजकुमार चिकटे यांच्या संस्थेने जिलाधिकारी कडे 186 पानांचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यावेळी तत्कालीन तहसीलदार संतोष खांडरे व तत्कालीन तलाठी प्रभावत यांनी त्या जागेवर रस्ता आहे असा अहवाल सादर केला आहे. पण त्या जागेवर वर्तमान स्थितीत रस्ता नाही.

यादरम्यान महेंद्रसिंग बैस चा प्रस्ताव तातडीने मंजूर करून उपविभागीय अधिकारी कडे पाठविण्यात आला आहे. त्यासोबत खोटे शपथपत्र व दस्तावेज सादर केल्याचा आरोप राजकुमार चिकटे ने केला आहे.

महेंद्रसिंग बैस हे शासकीय जमीन निवासच्या शासकीय नियम व अटीत बसत नसतांना देखील तहसील कार्यालय व शहर मनपा च्या अधिकारी यांनी महेंद्रसिंग बैस यांना सहकार्य करीत शासकीय राजस्व विभाग ची जागा बैंस यांच्या घशात घालण्यासाठी सहकार्य केल्याचे समोर येत आहे.

यासंदर्भात पुलिसात तक्रार सुध्दा केली आहे. परंतु आतापर्यंत गुन्हा दाखल झाला नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना चंद्रपूर महानगरपालिका व तहसील कार्यालय प्रशासन हस्तक्षेप करीत आहे.

यासंदर्भात दोन्ही कार्यालयात आक्षेप अर्ज देण्यात आले परंतु अजुन पर्यंत यांची दखल घेतली नाही. या जागेवर आता अवैद्य अतिक्रमण बांधकाम शुरू आहे. प्रशासनाने आमचे अतिक्रमण दोन दिवसात काढले मग महेंद्रसिंग बैस यांचे दोन महीन्यापासून सुरू असलेले अतिक्रमण जिला प्रशासन, तहसील प्रशासन, मनपा प्रशासन का काढत नही असा प्रश्न चिकटे यांनी पत्रपरीषदेत केला.

शासकीय जागेवरील अतिक्रमण तात्काळ हटविण्याबाबत तसेच अतिक्रमण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची तक्रार पुलिसात केली आहे. तरी देखील दोन्ही प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. प्रशासनावर दबाव आनुन बंधु महेंद्रसिंग बैस च्या नावे जागा करण्यास प्रशासनावर दबाव टाकत आहे असा आरोप सुरज चिकटे यांनी केला आहे.

यासंदर्भात चंद्रपुर शहर महानगरपालिका प्रशासन व तहसील प्रशासन ने याविषयी गंभीरतेने लक्ष देऊन संस्था व राजकुमार चिकटे यांना न्याय मिळवुन द्यावा व शासकीय जागेवर करण्यात आलेले अतिक्रमण, अवैद्य बांधकाम तत्काळ हटवावे व टैक्ट घेणाऱ्या अधिकारी वर गुन्हा दाखल करण्याची मागणी पत्रपरीषदेत बहुजन हिताय बहुजन सुखाय के अध्यक्ष सुरज चिकटे यांनी केली आहे.

पत्रपरिषदेत सुरज चिकटे व किशोर पोतनवार उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular