Saturday, April 20, 2024
HomeCrimeसराईत गुन्हेगाराकडुन दोन मोटरसायकल जप्त ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

सराईत गुन्हेगाराकडुन दोन मोटरसायकल जप्त ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Two motorcycles seized from serial criminals
Action by Chandrapur local crime branch

चंद्रपुर :- जिल्हयात मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड होण्याचे प्रमाण कमी असल्याने अभिलेखावरील उघड गुन्हे तात्काळ उघडकिस आणणेबाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांनी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर येथिल पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे मार्गदर्शनाखाली शाखेचे पथकांना आदेशीत केले. Crime

पोलीस निरीक्षक श्री. महेश कोंडावार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकांना शहरात प्रभावी पेट्रोलींग करून मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकिस आणण्याचे निर्देश दिले होते.
दिनांक 1 मार्च 2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे LCB पथकातील अधिकारी व कर्मचारी चंद्रपुर शहर, रामनगर हद्दीत पेट्रोलींग करीत असता गोपनीय बातमीदार कडुन माहीती मिळाली कि, एका सराईत चोराकडे दोन मोटरसायकल असुन त्याने मोटरसायकल आपले घरी लपवुन ठेवल्या आहेत. अशा खबरेवरून सदर चोरास त्याचे राहते घरी पकडले व त्यास विचारपुस केली असता त्याने काही दिवसाआधी चंद्रपुर शहर हददीतील आझाद बगिचा जवळुन व रामनगर हददीतील डॉ. मुसळे यांचे दवाखान्या समोरून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली.

सदर कबुली वरून अतुल विकास राणा वय 25 वर्षे रा. नगिनाबाग, चंद्रपुर याचेकडुन गुन्हयातील वाहन चोरीचा मुद्देमाल हिरो होंडा पॅशन क्र. MH34 BD3854 किंमत 22,000/ रुपये व MH34 X 5327 किमत 25,000/-रू. असा एकुण 47,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सराईत गुन्हेगाराकडुन पोलीस ठाणे चंद्रपुर शहर अप. क. 149/24 कलम 379 भादंवि व पोलीस ठाणे रामनगर येथे अप. क. 231/24 कलम 379 भादंवि गुन्हे उघड करण्यात आले.

सदर कर्यवाही पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर येथिल पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सपोनी. जितेंद्र बोबडे, पो.हवा. नितीन साळवे, प्रकाश बलकी, सुभाष गोहोकार, पोशि. मिलींद जांभुळे, रूषभ बारसिंगे यांनी केली आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular