Friday, January 17, 2025
Homeक्रीडा व मनोरंजनचंद्रपुरात दोन दिवसीय धम्मपरिषद व परिचय मेळावा २ मार्चपासून

चंद्रपुरात दोन दिवसीय धम्मपरिषद व परिचय मेळावा २ मार्चपासून

A two-day Dhamma Parishad and Introduction Meeting in Chandrapur from March 2;  Mahatma Jotiba Phule and His Excellency Dr.  On behalf of Babasaheb Ambedkar Vihar Sankurshan Samiti Chandrapur

म. जोतिबा फुले तथा प.पू.डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारसंवर्धन समितीचे आयोजन

चंद्रपूर :- महात्मा जोतिबा फुले तथा प.पू.डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती चंद्रपूरच्या वतीने स्थानिक वडगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात दोन दिवसीय धम्मपरिषद, परिचय आणि प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. २ मार्च आणि ३ मार्च रोजी धम्मपरिषद व परिचय मेळावा होणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने या दोन दिवसीय कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन समितीचे सचिव दिलीप वावरे यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केले अहे.

२ मार्च रोजी दुपारी २ वाजता दीक्षाभूमी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनपर्यंत धम्मरॅली काढण्यात येणार असून, भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिका दलाचे कार्यकर्ते, स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. ३ वाजता धम्मपरिषदेला सुरुवात होईल. या धम्मपरिषदेचे उद्घाटन नागपूर येथील भदन्त डॉ. मेत्तानंद यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी भदन्त धम्मघोष मेत्ता राहणार आहेत. यावेळी भदन्त सोविता, भदन्त महेंद्ररत्न, भदन्त धम्मशिखर, भदन्त जीवक, भदन्त प्रज्ञाप्रिय, भदन्त सुमंगल, भदन्त धम्मप्रकाश संबोधी, भदन्त बुंधागबोधी, भदन्त प्रज्ञाबोधी आदी उपस्थित राहणार आहे. तर रविवार ३ मार्च रोजी पहिल्या सत्रात सकाळी ११ वाजता परिचय मेळाव्याला सुरुवात होईल. या मेळाव्याचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा पाझारे यांच्या हस्ते होणार आहे. तर अध्यक्षस्थानी समितीचे कार्याध्यक्ष राजू खोब्रागडे राहतील. परिचय मेळाव्यात विवाह जुळलेल्या जोडप्यांचे विवाह समितीतर्फे लावून देण्यात येणार असून, यापूर्वी अनेकांचे विवाह परिचय मेळाव्यात समितीने लावून दिल्याची माहिती या पत्रपरिषदेत देण्यात आली.

द्वितीय सत्रात प्रबोधन आणि स्नेहमिलन कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन आंबेडकरी विचारवंत खुशाल तेलंग यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष विजय उमरे राहतील. तर नागपूर ग्रामीण डाक विभागाचे साहाय्यक अधीक्षक प्रमोद शंभरकर, व्हीएनआयटीचे सेवानिवृत्त प्रा. डॉ. देविदाास मैस्के प्रबोधनपर मार्गदर्शन करतील. समितीचे उपाध्यक्ष चेतन उंदिरवाडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहतील.

सायंकाळी ७.३० ‘मी रमाई बोलते’ हा एकपात्री प्रयोग गायत्री रामटेके या सादर करतील.

दोन दिवसीय कार्यक्रमाला समाजबांधवांनी मोठ्या संख्यने उपस्थित राहावे असे अवाहन महात्मा जोतिबा फुले तथा प.पू.डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती चंद्रपूरच्या वतीने यावेळी करण्यात आले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular