Transporter arrested for molesting minor girl
चंद्रपूर :- शहरातील प्रसिद्ध वाहतूकदार पप्पू उर्फ हरिकिसन मल्हन वय 58 वर्ष याला त्याच्या मित्राच्या 12 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी रामनगर पोलिसांनी 3 मे शुक्रवार रोजी अटक केली. Crime
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मल्हन टायरचा व्यवसाय करणाऱ्या त्याच्या एका मित्राला त्याच्या दुकानात भेटण्यासाठी गुरुवारी गेला असता त्याच्या मित्राशी काही वेळ गप्पा मारल्यावर,मल्हनने लघुशंका करायची आहे असे सांगितले त्याच्या मित्राने त्याला दुकानाच्या वर असलेल्या त्याच्या घरातील वॉशरूम वापरण्यास सांगितले. molesting minor girl
मल्हन मित्राच्या घरी लघुशंकेसाठी गेला तेव्हा त्याला त्याची 12 वर्षांची मुलगी घरात एकटी दिसली. संधी साधून पप्पू मल्हनने अश्लील कृत्य केले. एवढेच नाहीतर मुलीला तिच्या पालकांना न सांगण्याची धमकी दिली.
मात्र आरोपी गेल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार तिच्या पालकांना सांगितला. संतप्त पालकानी बालिकाला रामनगर पोलीस नेऊन तक्रार नोंदविली.
पोलिसांनी मल्हनवर विनयभंग केल्या प्रकरणी कलम 354, 354 अ, पीओसी कायद्याच्या अधिकाराच्या संबंधित कलम आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार) कायद्यानुसार गुन्हा नोंद केला आहे. मल्हनला अटक करून पोलिसांनी त्याची कारागृहात रवानगी केली.
पुढील तपास वरिष्ठ उपविभागीय पोलीस अधीकारी सुधाकर यादव करीत आहेत.
आरोपी मल्हनच्या मित्रावर गुन्हा दाखल
पप्पू मल्हानने मुलीचा विनयभंग केल्याचे कळताच त्याने धाव घेतली पण पप्पू निघून गेला होता. मित्राने बरेच कॉल केले पण त्याने कॉल घेतला नाही. संतप्त मित्राने पप्पूला गाठले आणि चोप दिला, या मारहाणीची तक्रार पप्पूने दिल्यावर त्या मित्रावर पोलिसांनी कलम 324 नुसार गुन्हा नोंदविला आहे.अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांनी दिली.