Traffic on Ballarpur Road reflected on the occasion of Botanical Garden inauguration
चंद्रपूर :- जिल्ह्यातील बल्लारपूर बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील बॉटनिकल गार्डनचा उद्घाटन सोहळा. Botanical Garden inauguration दिनांक 11 मार्च 2024 आयोजित करण्यात आलेला आले.
बॉटनिकल गार्डन उद्घाटन सोहळ्याला मोठया प्रमाणात जनसमुदाय उपस्थित राहणार आहे.
बॉटनिकल गार्डनचे उद्घाटन सोहळयाकरीता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde तसेच महाराष्ट्र राज्याचे इतर मंत्री महोदय व मान्यवर, उपस्थित राहणार आहेत.
करिता चंद्रपूर ते बॉटनिकल गार्डन विसापूर या महामार्गावरून मान्यवरांचे व नागरिकांचे आगमन व निर्गमन होणार असल्याने त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून वाहतुकीला अडथळा निर्माण होवू नये या करीता या मार्गावरील अवजड वाहतुक बंद ठेवणे आवश्यक असल्याची अधिसूचना जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केले.
दिनांक 11/03/2024 रोजी दुपारी 2.00 वाजता ते रात्रो 21.00 वाजता पर्यंत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे दृष्टीने बामणी फाटा बल्लारपूर ते बंगाली कॅम्प चौक, चंद्रपूर पर्यंत अवजड वाहतुक बंद ठेवण्याचे याव्दारे आदेशित करण्यात आले आहे.
अवजड वाहतुकदारांना या पर्यायी मार्गाचा वापर करावा
वरोरा, भद्रावती व चंद्रपूर कडून राजुरा किंवा गडचांदूर कडे जाण्यासाठी पडोली – धानोरा फाटा भोयगाव रोडचा अवलंब करावा, गडचांदूर व राजुरा कडून वरोरा, भद्रावती व चंद्रपूर कडे येण्यासाठी भोयगाव – धानोरा फाटा – पडोली या मार्गाचा वापर करावा, गोंडपिपरी व कोठारी कडून चंद्रपूर किंवा मुल जाण्यासाठी येनबोडी – पोंभुर्णा या मार्गाचा वापर करावा, चंद्रपूर व मूल कडून बल्लारशा, गॉडपिपरी, राजुरा जाण्याकरीता पोंभुर्णा -येनबोडी मार्गाचा अवलंब करावा.
वरीलप्रमाणे निर्देशाचे पालन करून अवजड वाहतुकदारांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. आहे.