Thursday, September 12, 2024
spot_img
spot_img
HomePoliceताडोबा महोत्सवाकरिता 1 ते 3 मार्च शहरातील वाहतुकीत बदल

ताडोबा महोत्सवाकरिता 1 ते 3 मार्च शहरातील वाहतुकीत बदल

Traffic changes in the Chandrapur city from March 1 to 3 for Tadoba festival ; Appeal of the Superintendent of Police

चंद्रपुर :- शहरात दिनांक 1 मार्च ते 3 मार्च 2024 पर्यंत ताडोबा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. या महोत्सवामध्ये चांदा क्लब ग्राउंड येथे 3 दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या कार्यक्रमाकरीता नागरीकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्याकरीता महाराष्ट्र पोलीस अधिनियमा नुसार सार्वजनिक ठिकाणी सुरळीत रहदारी व सुव्यवस्था राखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना व नियमणासाठी प्राप्त असलेल्या कायदेशीर अधिकारान्वये चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक मुग्मका सुदर्शन यांनी मार्गावर वाहतुक सुरळीत चालावी, वाहतुकीस कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये व जनतेला त्रास, अगर गैरसोय होऊ नये म्हणून वाहतुक व्यवस्थेमध्ये बदल करण्याची अधिसुचना निर्गमीत केली आहे.

दिनांक 1 मार्च ते 3 मार्च 2024 पर्यंत दुपारी 12 वाजता ते रात्रौ 12 वाजेपर्यंत वरोरा नाका ते मित्र नगर चौक तसेच पाण्याची टाकी ते वरोरा नाका पर्यंतचा मार्ग हा ताडोबा महोत्सवा करीता येणाऱ्या वाहनाखेरीज इतर सर्व प्रकारचे वाहनाकरीता बंद राहील. वरील दोन्ही मार्ग हे नो हॉकर्स झोन No Howkers Zone म्हणुन घोषीत करण्यात आले आहे.

या कालावधीत सर्व वाहतुक दारांनी नागपूरकडून शहराकडे जाणारी वाहने वरोरा नाका – उड़ानपुल – सिध्दार्थ हॉटेल – बस स्टॅड – प्रियदर्शनी चौक मार्गे
किंवा जिल्हाधिकारी निवासस्थान मार्गे जिल्हा स्टेडियम – मित्र नगर चौक – संत केवलराम चौक मार्गे शहरामध्ये प्रवेश जातील.

शहरातुन बाहेर जाण्यासाठी नागरीकांनी जटपुरा गेट – प्रियदर्शीनी चौक – बस स्टॅण्ड चौक – सिध्दार्थ हॉटेल – उडान पुल – वरोरा नाका मार्गे किंवा संत केवलराम चौक – मित्र नगर चौक – जिल्हा स्टेडियम – जिल्हाधिकारी निवासस्थान मार्गे बाहेर जातील.

वाहनांची राखीव व्यवस्था Parking डॉ आंबेडकर कॉलेज, चांदा क्लब ग्राउंड समोरील न्यू इंग्लिश दरगाह मैदान, कृषी भवन जवळील ट्रॅव्हल्स स्टँड व दुचाकी वाहनांसाठी वरोरा नाका उड्डाणपुला जवळील चर्च मैदान ग्राउंड येथे करण्यात आली आहे.

नागरीकांनी सदर अधिसुचनेचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular