Tuesday, November 5, 2024
Homeआमदारधावपळीच्या जीवनात समाजातील योग्य स्थळ शोधण्यासाठी परिचय मेळावे गरजेचे - आ. किशोर...
spot_img
spot_img

धावपळीच्या जीवनात समाजातील योग्य स्थळ शोधण्यासाठी परिचय मेळावे गरजेचे – आ. किशोर जोरगेवार ; तेली युवक मंडळच्या वतीने उपवर – उपवधू परिचय मेळाव्याचे आयोजन

To find the right place in the society in the hectic life, it is necessary to get acquainted – MLA Kishore Jorgewar;  Organized groom-to-bride introduction meeting on behalf of Teli Youth Mandal

चंद्रपूर :- मुला – मुलींचे लग्न जमविणे हे अत्यंत कठीण बाब असल्याची जाणीव वधू – वरांच्या पालकांना येत येत आहेत. मुला – मुलींची लग्नं जमावी याकरिता अनेक पालक मंडळी अथवा त्यांच्या नातेवाईकांची धावपड सुरु असते. यावर तोडगा म्हणून आता उपवर उपवधू परिचय मेळाव्यांकडे पाहिल्या जात आहे. त्यामुळे धापडीच्या जिवणात समाजातीलच योग्य स्थळ शोधण्यासाठी अशा मेळाव्यांचे आयोजन गरजेचे असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

मातोश्री सभागृह येथे विदर्भ तेली समाज महासंघ, तेली युवक मंडळच्या वतीने भव्य उपवर – उपवधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला विदर्भ तेली समाजाचे केंद्रीय अध्यक्ष रघूनाथ शेंडे, माजी आमदार देवराव भांडेकर, प्रा. सुर्यकांत खनके, शहर अभियंता अनिल घुमडे, विदर्भ तेली समाजाचे उपाध्यक्ष धनराम मुंगले, तेली समाज चंद्रपूर जिल्हा महिला अध्यक्ष मिनाश्री गुजरकर, प्रा. गंगाधर कुनघाडकर, जितेंद्र ईटनकर, गोविल मेहकुले, गोपाल ईटनकर, चंदा वैरागडे, सतीश बावणे, नरेंद्र इटनकर, राजेंद्र सावरकर, डॉ. भगवनीका गायकवाड, यांच्यासह ईतर मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, तेली हा सेवेकरी समाज आहे. अनेक सामाजिक आणि धार्मीक कार्यक्रमात हा समाज सक्रियरित्या सहभाग नोंदवितो. आपण चंद्रपूरात आयोजित केलेल्या श्री माता महाकाली महोत्सवातही या समाजाने सेवा दिली. मात्र आता सेवेकरी समाज मागे पडत आहे. त्यामुळे समाजाला एकत्रीत आनण्या-या अशा आयोजनातून याबाबत चिंता आणि चिंतन झाले पाहिजे. आपल्या समाजातील युवकांमध्ये प्रतिभा आहे. समाजातील पूढा-यांनी आता पूढाकार घेत आपल्या युवकांना योग्य मार्गदर्शन करावे. असे ते यावेळी म्हणाले.

लोकप्रतिनीधी म्हणुन मी सदैव तेली समाजा सोबत राहिलो आहे. या समाजाचे अनेक प्रश्न आहेत. याचीही मला जान आहे. ते सोडविण्याच्या दिशेने आपले प्रयत्य सुरु आहे. संताजी शिक्षण प्रसारक मंडळाला समाज भवन उभारण्यासाठी आपण ३० लक्ष रुपयांचा निधी दिला आहे. तर बाबूपेठ येथेही तेली समाज भवणासाठी २० लक्ष रुपयाचा निधी मला देता आला याचा आनंद आहे. समाजाने आवश्यक त्या मागण्या कराव्यात त्या पुर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहिल असे ते यावेळी म्हणाले. तेली युवक मंडळच्या वतीने दरवर्षी हे आयोजन केल्या जात आहे. समाजाच्या वतीनेही मोठे सहकार्य याला लाभत आहे. हेच या समाजाचे वैशिष्ट आहे. आजच्या या मेळाव्यात अनेक ऋणानुबंध जुळतील असा विश्वास यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular