Sunday, December 8, 2024
HomeAccidentतेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेचा वाघाने घेतला बळी
spot_img
spot_img

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेचा वाघाने घेतला बळी

tiger killed a woman who went to collect tendu leaves

चंद्रपूर :- नेहमीप्रमाणे आज दिनांक 5 मे 2024 रोजी सकाळी दीपा दिलीप गेडाम नामक महिला राहणार बामणी माल तालुका सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी जंगलात गेली असता सकाळी 8-30 च्या सुमारास दीपा तेंदू संकलन करण्यात व्यस्त असतांना आणि सोबत असलेले सहकारी थोडे लांब असल्याचा फायदा घेत पट्टेदार वाघाने दिपावर हल्ला करून दिपाला जागीच ठार केले. Tiger Attack

सभोवतालच्या तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या सोबत्यांना सदर घटना माहिती होताच एकच गोंधळ उडाला.

सदर घटना Sindewahi Police Station सिंदेवाही पोलीस ठाणे हद्दीत Shiwani Forest Area वनविभाग शिवणी कंपार्टमेंट नंबर 322 मधील पेटगाव खातेरा जंगल परिसरात घडली.

जमावाने संताप व्यक्त केल्याने आणि प्रेत नेऊ देण्यास मनाई केल्याने वनविभागाची धांदल उडाली.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता वनविभागाने सिंदेवाही पोलीस स्टेशनला माहिती दिली.

पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन हाताबाहेर जात असलेल्या जमावाची वनविभागाच्या मार्फत समजून काढून संतापलेल्या जमावाला शांत केले आणि पंचनामा करून प्रेत ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे उत्तरीय तपासणीसाठी रवाना करण्यात आले.

सदर ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला असून परिसरात शांतता आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular