Tiger dies in train collision
चंद्रपूर :- चांदाफोर्ट – गोंदिया रेल्वेच्या धडकेने वाघाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी घडली. चंद्रपूर जिल्ह्यातील किटाळी मेंढा येथील नागभीड तालुक्यात घडलेल्या या घटनेने वन्यजीवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. Tigers Death
वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू आहे. यापूर्वीही या मार्गावर वाघ आणि बिबट्यांचा Tiger and Leopard रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाला आहे. हा संपूर्ण मार्ग जंगलातून जात असल्याने वाहनांचा वेग कमी ठेवण्याच्या सूचना वनविभागाकडून या आधीही देण्यात आल्या आहेत.