Thursday, February 22, 2024
Homeअपघाततुकुम येथील तिन दुकानांना आग ; आमदार किशोर जोरगेवार यांनी पाहणी करत...

तुकुम येथील तिन दुकानांना आग ; आमदार किशोर जोरगेवार यांनी पाहणी करत केली आर्थिक मदत

Three shops in Tukum caught fire;  MLA Kishore Jorgewar inspected and provided financial assistance

चंद्रपूर :- तुकुम येथील तिन दुकानांना रात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना समोर आली होती. दरम्यान आज आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर दुकानांची पाहणी केली असून पिढीत दुकान मालकांना आर्थिक मदत केली आहे. यावेळी तहसील विभाग, महावितरण आणि मनपा च्या अधिका-यांची उपस्थिती होती.

तुकुम येथील मुक्ताई इलेक्ट्रिेकलच्या दुकानाला मध्य रात्रीच्या सूमारास आग लागली या आगीने लगतच्या दोन दुकानांना आपल्या कवेत घेतल्याने तिनही दुकानातील सामान जळून खाक झाले आहे. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शाॅट सर्कीटमुळे ही आग लागल्याचा प्राथमीक अंदाज आहे.

दरम्यान आज रविवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर दुकानांची पाहणी केली असुन आगे मागचे कारण समजुन घेतले आहे. अशा प्रसगांवर तात्काळ नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन पथकाने तत्पर राहण्याच्या सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा अधिका-यांना केल्या आहे. शाॅट सर्कीटमुळे वारंवार आग लागल्याचे प्रकार समोर येत आहे. यासाठी महावितरणनेही पुढाकार घेत याबाबत उपाययोजना करण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले आहे.

याप्रसंगी आगीने नुकसान झालेल्या दुकान मालकांना आमदार किशोर जोरगेवार यांनी आर्थिक मदत केली असून तात्काळ घटनेचा पंचनामा करण्याच्या सूचना केल्या आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular