Monday, March 17, 2025
HomeCrimeतीन मोबाईल बाळगणारा संशयित शहर पोलीसांच्या ताब्यात

तीन मोबाईल बाळगणारा संशयित शहर पोलीसांच्या ताब्यात

Suspect in possession of three mobile phones and bike in custody of city police

चंद्रपूर (चंद्रपूर टुडे) :- चंद्रपूर शहर पोलिसांचे पथक मोहरम निमित्त पेट्रोलिंग करीत असतांना आंबेडकर चौकात लहान बाळ सोबत आणी त्याचे जवळ 3 मोबाईल व एक मोटरसायकल बाबत विचारपूस केली असता उडवाउडवी चे उत्तर दिल्याने पोलिसांनी अटक केली यात 3 मोबाईल व मोटरसायकल असा एकूण 52 हजरांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Crime

दिनांक 15 जुलै रोजी पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर हद्दीत पोउपनि संतोष निंभोरकर व गुन्हे शोध पथकातील अंमलदार मोहरम निमित्ताने पेट्रोलिंग करीत असतांना गांधी चौक ते जटपुरा रोडवरील आंबेडकर चौक परीसरात संशयित एक इसम पत्नी, लहान बाळासह संशयितरित्या फिरत असतांना आढळून आला. पोलिसांनी तेथे फिरण्याचे कारण विचारले असता त्यांचेजवळील मोबाईल विकी करण्यासाठी फिरत असल्याचे त्यांनी सांगितले, त्याचे नावे विचारले असता करण नाना जाधव, वय 29 वर्षे, रा.बोरव्हा, पोस्ट-खंडाळा, ता.तेल्हारा, जि. अकोला व सौ. पुजा करण जाधव, असे सांगितले. Suspect arrested by Chandrapur city police

त्याचे ताब्यातील होंडा फैशन प्लस मोटरसायकल क्र. एमएच 27 एन 8423 बाबत विचारपुस केली असता काहीही समाधानकारक उत्तर दिले नाही. यावरून सदर इसम करण नाना जाधव याचे ताब्यात तिन मोबाईल अंदाजे किंमत 27,000 रूपये व मोटरसायकल एमएच 27 एन 8423 सदर मोटरसायकल मोहम्मद युनिस अब्दुल गणी रा. पिंपळखुटा, ता. मोर्शी. जि. अमरावती यांचे नावाने असलेली अंदाजे किंमत 25,000 रूपये जप्त करण्यात आले.

सदरचे तिन्ही मोबाईल व मोटरसायकल संशयित इसमाने चोरी केले अथवा लबाडीने मिळविले असल्याचा दाट संशय असून, मोबाईल व मोटरसायकलचे मालकी हक्काबाबत तसेच ताब्यात बाळगण्याचे कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही.

दरम्यान पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे महाराष्ट्र पोलीस अधिनयम अन्वये अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही सुदर्शन मुमक्का पोलीस अधिक्षक चंद्रपूर, रिना जनबंधु अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर, सुधाकर यादव उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात प्रभावती एकुरके पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर यांचे सुचनेप्रमाणे मंगेश भोगांडे स.पो. नि, संतोष निंभोरकर पोउपनि, सफौ विलास निकोडे, पोहवा महेद्रं बेसरकर, सचिन बोरकर, निलेश मुडे, मपोहवा भावाना रामटेके, संतोष पंडीत, इम्रान खान, संतोष कावळे, दिलीप कुसराम, शाहबाज, रूपेश रणदिवे, रूपेश पराते, इरशाद, मंगेश मालेकर, गुन्हे शोध पथक, पो.स्टे चंद्रपूर शहर यांनी कारवाई केली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular