Sunday, March 23, 2025
HomeLoksabha Electionसामान्य निरीक्षकांनी घेतला निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा ;  नियोजन सभागृह येथे नोडल अधिका-यांची...

सामान्य निरीक्षकांनी घेतला निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा ;  नियोजन सभागृह येथे नोडल अधिका-यांची बैठक

The general inspector reviewed the preparations for the election
Meeting of Nodal Officers at Planning Hal

चंद्रपूर :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी सामान्य निवडणूक निरीक्षक, कायदा व सुव्यवस्था निवडणूक निरीक्षक आणि खर्च निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने सामान्य निवडणूक निरीक्षक लोकेशकुमार जाटव यांनी जिल्ह्यातील तसेच चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.

नियोजन सभागृह येथे निवडणुकीशी संबंधित सर्व यंत्रणा तसेच नोडल अधिका-यांची आढावा बैठक श्री. जाटव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., कायदा व सुव्यवस्था निवडणूक निरीक्षक सुजीत दास, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, सहायक जिल्हाधिकारी (आर्णी) सुहास गाडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, मनपा आयुक्त विपीन पालीवाल आदी उपस्थित होते.

लोकेशकुमार जाटव म्हणाले, निवडणुकीसाठी मतदानाचे साहित्य घेऊन जातांना डिस्पॅच सेंटरमध्ये आवश्यक प्रमाणात मनुष्यबळ ठेवावे. तसेच संबंधित यंत्रणेतील अधिकारी व कर्मचा-यांना वैयक्तिक मॅसेज जाणे आवश्यक आहे. मतदान झाल्यानंतर ईव्हीएम गोळा करतांना अतिशय दक्ष राहावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी सादरीकरण करतांना जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी, जिल्ह्याचा आढावा, मतदान प्रक्रियेमध्ये असलेले मनुष्यबळ व्यवस्थापन, अधिकारी – कर्मचा-यांचे प्रशिक्षण, साहित्य व्यवस्थापन, कायदा व सुव्यवस्था, मतदान यंत्र सुरक्षा व व्यवस्थापन, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी, निवडणूक खर्च व्यवस्थापन, मतपत्रिका, पोस्टल बॅलेट, मतदार मदत केंद्र, तक्रार निवारण केंद्र, सी – व्हीजील ॲप, 85 वर्षांवरील व्यक्तिंना तसेच 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या व्यक्तिंना गृहमतदानाची सुविधा आदींबाबत निवडणूक निरीक्षकांना माहिती दिली.

बैठकीला सर्व उपविभागीय अधिकारी, नोडल अधिकारी व विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular