The dream of an incomplete graduate will now be fulfilled – Dr. Amudala Chandramouli Degree Program launched at Nimani: 24 students admitted
• निमणी येथे पदवी अभासक्रमाचा शुभारंभ • २४ विद्यार्थांनी घेतला प्रवेश
चंद्रपूर :- ग्रामीण भागातील विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांनी सुरू केलेल्या विद्यापीठ आपल्या गावात बी. ए. पदवी अभ्यासक्रमामुळे अपूर्ण पदवी प्राप्तचे स्वप्न आता पूर्ण होणार असल्याचे मत अधिष्ठाता मनव्या विभाग तथा प्राचार्य डॉ आमुदाला चंद्रमौली यांनी व्यक्त केले ते ग्रामपंचायत निमणी महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स, गडचांदूर तथा आदर्श पदवी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने निमणी येथे विद्यापीठ आपल्या गावी कार्यक्रमात उदघाटक म्हणून बोलत होते. Commencement of degree program
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सल्लागार समिती सदस्य प्रा. डॉ. संजय गोरे, से. नि. प्राचार्य दौलत भोंगळे, सरपंच परिषद मुंबईचे जिल्हा समन्वयक प्रा. आशिष देरकर, सरपंच अतुल धोटे, उपसरपंच शिल्पा जगताप, चेतन वानखेडे, चेतन वैद्य, मनोहर बांदरे, अजयकुमार शर्मा, मुख्याध्यापक भालचंद्र कोंगरे, अशोक झाडे, प्रफुल काळे आदी उपस्थित होते.
प्रा. संजय गोरे यांनी सांगितले की, जे विद्यार्थी बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर परिस्थितीनुसार शिक्षणाच्या प्रवाहातून दूर गेले अश्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून रोजगाराभिमुख शिक्षण देऊन आत्मनिर्भर करणे हा विद्यापीठ आपल्या गावी पदवी अभ्यासक्रमाचा मुख्य हेतू आहे
अध्यक्षीय भाषणात डॉ. शैलेंद्र देव म्हणाले की या अभिनव उपक्रमामध्ये पुस्तकी शिक्षणाचा अतिरेक टाळून कौशल्य विकासावर भर देण्यात येणार असून विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी प्राप्त होईल.
अत्यंत कठीण परिस्थितीतुन शिक्षण घेऊन नौकारीवर लागणारे निमणी येथील पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद मधुकर टेकाम हेड कॉन्स्टेबल उषा सुधाकर लेडांगे कॉन्स्टेबल जी डी राहुल जनार्धन सावरकर मुंबई पोलीस प्रियंका जनार्धन झाडे केमिकल इंजिनिअर स्नेहल सहदेव ब्राह्मणे यांचा गावकऱ्यांच्या वतीने शाल श्रीफळ शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन उमेश राजूरकर प्रास्ताविक विठ्ठल कोरडे तर आभार भरत घेर यांनी मानले यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी नागरिक उपस्थित होते.