The district ranks first in various development indices
Chandrapur District Collector Vinay Gowda will be awarded in Mumbai
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्याने विविध विकास निर्देशांकाबाबत प्रथम क्रमांक नोंदविल्यामुळे जिल्हाधिकारी विनय गौडा Chandrapur District Collector Vinay Gauda यांना मुंबई येथे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
दि.15 फेब्रुवारी 2024 रोजी मुंबई येथे होणाऱ्या
जिल्हा निर्देशांक 2023 या समारंभात सदर पुरस्कार देण्यात येणार आहे.
लोकसत्ता चा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम म्हणजे “जिल्हा निर्देशांक”. सांख्यिकी विभागाकडे असलेल्या तपशिलाच्या आधारे पुणे येथे विख्यात गोखले अर्थशास्त्र संस्थेतर्फे विविध जिल्ह्याच्या कामगिरीचे विश्लेषण केले गेले. त्यानुसार, चंद्रपूर जिल्ह्याने विविध विकास निर्देशांकाबाबत प्रथम क्रमांक नोंदविला.
या निर्देशांकाचे सादरीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy CM Devendra Fadanvis यांच्या उपस्थितीत होणार असून यावेळी केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. अनंत नागेश्वरन यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.