The country needs the vision and nationalistic thoughts of freedom hero Savarkar – Hansraj Ahir
चंद्रपूर :- स्वातंत्र्यवीर वि.दा सावरकरजी महान राष्ट्रभक्त, दूरदृष्टीचे भवितव्यवेता होते. त्याकाळी सैन्य शक्तीचे देशाकरीता असलेले महत्व विचारात घेत त्यांनी देशातील युवकांना सैन्यात भरती होवून राष्ट्रसेवेत आपले जीवन समर्पित करण्याचे आवाहन केले होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांची अग्नीवीर संकल्पना याच दूरदृष्टीतून असल्याचे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर Hansraj Ahir यांनी सांगीतले.
चंद्रपूर महानगरातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे दि. २६ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित स्वातंत्र्यवीर स्मृती अभिवादन समारंभास उपस्थितांना संबोधित करतांना अहीर म्हणाले की, राष्ट्रद्रोही व देशाच्या शत्रुंशी लढण्यासाठी अग्नीवीर संकल्पना भावी काळात महत्वपूर्ण ठरणार आहे. स्वा. सावरकरांसारख्या योध्दा राष्ट्रपुरूषांचे स्मारक प्रत्येक ठिकाणी उभारून त्यांच्या राष्ट्र समर्पित कार्याची प्रेरणा घेण्याची गरज असल्याचे अहीर याप्रसंगी म्हणाले.
या अभिवादन कार्यक्रमास खुशाल बोंडे, माजी महापौर अंजली घोटेकर, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, संदीप आवारी, गिरीष अणे, राजेंद्र अडपेवार, राजू घरोटे, विनोद शेरकी, सावरकर मंचाचे रवी येनारकर, सुरेश जुमडे, राजु वेलंकीवार तसेच अॅड. सुरेश तालेवार, पुनम तिवारी, श्रीकांत भोयर, राजेंद्र काणदेलवार, प्रमोद शास्त्रकार, रवी लोणकर, वंदना संतोषवार, अरूण तिखे, संजय जोशी, सुधीर टिकेकर, प्रकाश ताठे, चेतन शर्मा, वनसिंगेताई, इंगळे यांचेसह अनेकांची उपस्थिती होती.
याप्रसंगी अंजली घोटेकर यांनी समयोचित विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रत्नाकर जैन यांनी तर संचालन व आभार प्रदर्शन गिरीष अणे यांनी केले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून त्यांच्या स्मृतिस अभिवादन केले.