Saturday, April 20, 2024
HomeEducationalबीआरएस च्या अन्नत्याग आंदोलनकर्त्याची प्रकृती बिघडली ; आंदोलनाच्या पाचव्या दिवशी आंदोलन सुरूच

बीआरएस च्या अन्नत्याग आंदोलनकर्त्याची प्रकृती बिघडली ; आंदोलनाच्या पाचव्या दिवशी आंदोलन सुरूच

The condition of the BRS hunger strike agitator deteriorated
The agitation continued on the fifth day of the agitation

चंद्रपूर :- जिवती तालुक्यातील मूलभूत मागण्यांसाठी 27 फेब्रुवारी पासून केंद्र सरकारच्या वनविभागाच्या विरोधात बीआरएस चे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू असतांना आंदोलनाच्या पाचव्या दिवशी आज दिनांक 1 मार्च रोजी आंदोलक बालाजी आत्राम यांची प्रकृती हालावली स्थानिक पोलीसांनी त्यांना जिवती प्राथमिक आरोग्य रुग्णालयात प्रथमोपचार करून गडचांदूर उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

जितनी तालुक्याला वनविभागातुन काढून महसूल विभागात टाकण्यात यावे, जिवती तालुक्यातील सर्व शेतक-यांना सरसकट शेतजमिनीचे पट्टे देण्यात यावे, जिवती नगर पंचायत क्षेत्रात तात्काळ घरकुल योजना देण्यात यावी, जिवती तालुक्यातील वनविभागाच्या ना हरकत प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात यावी अश्या मागण्यांसाठी केंद्रसरकारच्या वनविभागा विरोधात बीआरएस चे राजुरा विधानसभेचे नेते भूषण फुसे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषणाला दिनांक 27 फेब्रुवारी 2024 पासून सुरुवात करण्यात आले यात उपोषणकर्ते बालाजी करले, सुभाष हजारे, नामदेव कोडापे, बालाजी आत्राम व रमेश आडे आदी आमरण उपोषनाला बसलेले होते आज दिनांक 1 मार्च 2024 रोजी बालाजी आत्राम यांना मधुमेहाचा त्रास वाढल्याने जिवती पोलीस घटनास्थळी दाखल होत स्थानिकांच्या सहकार्याने आंदोलनकर्ते बालाजी आत्राम यांना जिवती प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून प्रथमोपचार करून गडचांदूर उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यास सांगण्यात आले, आंदोलनकर्ते आत्राम यांची प्रकृती नाजूक असल्यामुळे त्यांनी अन्नत्याग आमरण उपोषणाची सांगता केली.

जिवती तालुक्यातील शेतकरी व नागरिकांच्या मागण्या पूर्ण होई पर्यंत अन्नत्याग उपोषण सुरू ठेवणार असल्याची भूमिका बीआरएस नेते भूषण फुसे तसेच अन्नत्याग आंदोलनाला बसलेल्या जीवतीचे योद्धा उपोषणकर्त्यांनी घेतले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular