Monday, March 17, 2025
HomeAgricultureयावर्षी २ केंद्रावर १४ फळ्यांवर तेंदूपत्ता संकलन : वाघाच्या दहशतीत संकलन

यावर्षी २ केंद्रावर १४ फळ्यांवर तेंदूपत्ता संकलन : वाघाच्या दहशतीत संकलन

Tendupatta collection on 14 planks at 2 centers this year: collection in fear of tiger

कोठारी :- बल्लारपूर तालुक्यात तेंदूपत्ता संकलनाच्या हंगामास सुरूवात झाली आहे. कोठारी वनपरिक्षेत्रात यावर्षी दोन केंद्रात १४ पानफळ्यांवर तेंदूपत्त्याचे संकलन करण्यात येत आहे. Tendupatta collection

कोठारी येथील जंगल व्याप्त आहे. बल्लारपूर तालुक्यातील अनेक गावांच्या रोजीरोटीचा प्रश्न जंगलावर अवलंबून आहे. कोठारी तसेच परिसरातील मुख्य पीक कापूस, सोयाबीन, मिरची, धानाचे आणि या पिकावरच या अनेक गवाचांचा अर्थव्यवस्था अवलंबून असली तरी या शेती सोबतच या तालुक्यातील अनेक गावातील नागरिक मोहफुले वेचणे गोळा करणे, तेंदूपत्ता संकलनाचे काम करणे यासारखी कामे करीत असतात.

यातील तेंदूपत्ता संकलनाचे काम सर्वाधिक लाभकारक आहे. तेंदूपत्ता संकलनाचे हे काम जवळपास एक महिना चालते. अगदी पहाटे जंगलात जाऊन पाने आणणे आणि दुपारपर्यंत घरी आल्यानंतर त्यांचे ‘मुळके’ तयार करून संध्याकाळच्या वेळेस ते पानफळीवर विक्रीसाठी नेणे असे हे काम आहे. या कामात घरातील सर्वच सदस्यांचा हातभार लागत असतो. तेंदूपत्ता संकलनाच्या महिनाभराच्या मिळकतीत कुटुंबाची आर्थिक स्थिती रूळावर येण्यास मोठा हातभार लागत असतो.

यावर्षी कोठारी वनपरिक्षेत्रात Kothari Forest दोन युनिट असून १४ पानफळ्यांवर तेंदूपत्ता संकलन सुरू आहे. यात कोठारी व आक्सपूर दोन युनिट सह अनेकव गावांचा यात समावेश आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular