Sunday, April 21, 2024
Homeआमदार11 हजार 111 दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाला मंदिर परिसर ; महाकाली महोत्सवात...

11 हजार 111 दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाला मंदिर परिसर ; महाकाली महोत्सवात दिव्यांची रोषणाई, अनुराधा पौडवाल यांच्या कार्यक्रमात अलोट गर्दी ; महोत्सवाच्या माध्यमातून आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूरकरांना भक्तीचा धागा बांधला -आ. विजय वडेट्टीवार

Temple area was illuminated with the illumination of 11 thousand 111 lights;  Illumination of lights during Mahakali festival. ◆ महोत्सवाच्या माध्यमातून आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूरकरांना भक्तीचा धागा बांधला – आ. विजय वडेट्टीवार

चंद्रपूर :- श्री माता महाकाली महोत्सवात गायत्री परिवाराच्या वतीने 11 हजार 111 दिवे लावत दिपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी दिव्यांच्या रोषणाईने मंदिर परिसर उजळून निघाला. तर सायंकाळी 7 वाजता युवा किर्तनकार सोपान दादा कनेरकर यांचा किर्तनाचा कार्यक्रम पार पडला. तर रात्री 9 वाजात सुप्रसिध्द गायिका अनुराधा पौडवाल यांचा भक्तीमय संगीत कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला भक्तांची अलोट गर्दी झाली होती. temple area was illuminated with the illumination of 11 thousand 111 lights;  Illumination of lights during Mahakali festival

माता मकाहाली महोत्सवाच्या चौथ्या दिवशी दिवसभरच विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात सायंकाळी ६ वाजता महोत्सव मंडप परिसरात गायत्री परिवारांच्या वतीने 11 हजार 111 दिवे लावत रोषणाई केले. त्यामुळे परिसर लखलखून निघाला होता. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन आदींची प्रमूख उपस्थिती होती. सायंकाळी सात वाजता सोपान दादा कनेरकर यांचा कार्यक्रम संपन्न झाला. हा कार्यक्रम पाहण्यासाठी विषेशत: युवकांनी मोठी गर्दी केली. तर रात्री 9 वाजता सुप्रसिध्द गायिका अनूराधा पौडवाल यांच्या कार्यक्रमाला सुरवात झाली या कार्यक्रमात भक्तांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी महोत्सव समितीच्या वतीने अनुराधा पौडवाल यांना मातेची मुर्ती देत सन्मानीत करण्यात आले.

◆ महोत्सवाच्या माध्यमातून आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूरकरांना भक्तीचा धागा बांधला -आ. विजय वडेट्टीवार

आमदार किशोर जोरगेवार Mla Kishor Jorgewar मातेचे मोठे भक्त आहे. त्यांनी चंद्रपूरात सुरु केलेल्या महोत्सवाला विशेष महत्व असून यातून चंद्रपूरकर मातेचा जागर करत आहे. त्यांनी या महोत्सवाच्या माध्यमातून चंद्रपूरकरांना भक्तीचा धागा बांधला असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार Opposition Leader Vijay Wadettiwar यांनी केले. महोत्सवाच्या चौथ्या दिवशी त्यांनी येथे भेट दिली. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महोत्सव समितीच्या वतीने त्यांचा महाकाली मातेची मुर्ती व चुनरी देत सत्कार करण्यात आला. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनीही महोत्सवाच्या चौथ्या दिवशी महोत्सवाला भेट देत शुभेच्छा दिल्यात यावेळी श्री महाकाली माता महोत्सव समितीचे अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार, सचिव अजय जयस्वाल, बलराम डोडाणी, मिलिंद गंपावार, अशोक मत्ते यांच्यासह इतर सदस्यांची उपस्थिती होती.

बाईपण भारी देवा या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फृत प्रतिसाद

महोत्सवात बाईपण भारी देवा.. मला पण आज बोलायचं आहे… या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महिला व मुलींचा मोठा प्रतिसाद लाभला. महिला आणि मुलींना मुक्त व्यासपीठ मिळावे यासाठी सदर आयोजन करण्यात आले होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular