Teacher Munna Gawli felicitated for outstanding performance in taluka level sports competition
चंद्रपूर :- तालूका स्तरीय बाल क्रिडा व सांस्कृतिक संमेलन 2023 – 24 येरूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहात संपन्न झाले यात मैदान प्रमुखाचे उत्कृष्ट कार्याबद्दल तसेच उत्कृष्ट खो खो पंच पदी कार्य केल्याबद्दल चोराळा प्राथमिक शाळेचे शिक्षक मुन्ना गवळी यांचा तसेच उपप्रमुख वसंता लिपटे व राकेश मानवावार यांना सन्मानित करण्यात आले.
दिनांक 8 व 9 फेब्रुवारी 2023 रोजी तालुका स्तरीय बाल क्रीडा व सांस्कृतिक संमेलन 2023-24 जि.प.उ. प्राथमिक शाळा येरूर येथे अतिशय उत्साहात पार पडले.
याप्रसंगी चंद्रपूर पंचायत समितीचे प्रशासक तथा गट विकास अधिकारी धनंजय साळवे, पंचायत समिती चंद्रपूरचे गटशिक्षणाधिकारी श्रीनिवास कांबळे यांच्या हस्ते मैदान प्रमुख म्हणून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल तथा उत्कृष्ट खो-खो पंच म्हणून कार्य केल्याबद्दल मुन्ना गवळी सर, उपप्रमुख म्हणून वसंता लिपटे सर व राकेश मानवावार सर यांचे शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
प्रथमच मैदान प्रमुख व उत्कृष्ट पंचाचा सत्कार व कौतुक केल्याबद्दल मुन्ना गवळी सर यांनी गट विकास अधिकारी धनंजय साळवे, पंचायत समिती चंद्रपूरचे गटशिक्षणाधिकारी श्रीनिवास कांबळे, विस्तार अधिकारी धनपाल फटींग यांचे धन्यवाद देऊन आभार व्यक्त केले.