Taught nursery technology lessons at Anand Krishi Niketan College warora
चंद्रपूर :- महारोगी सेवा समिती संचालित आनंद निकेतन कृषी महाविद्यालय, वरोरा, येथे महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ पुणे, आ.नि.कृ.म, वरोरा आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा मध्ये राष्ट्रीय फलोउत्पादन मंडळ – एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत फळे व भाजीपाला रोपवाटीका तंत्रज्ञान या निःशुल्क व निवासी शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन दि 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले होते.
प्रशिक्षणाचे उद्घाटन दिनांक 7 फेब्रुवारी रोजी प्राचार्य डॉ. सुहास पोतदार, श्री सुशांत लवटे उपविभागीय कृषी अधिकारी वरोरा, श्री सूचित लकडे, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली, सौ..मिली पुसदेकर, सहाय्यक प्राध्यापक (उद्यानविद्या) यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाले.
सदर प्रशिक्षणात चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 28 प्रशिक्षणार्थीनी सहभाग घेतला. सदर प्रशिक्षणात रोपवाटीका व्यवसाय संधी व आव्हाने, रोपवाटिकेतील माध्यमे व त्यांचे निर्जंतुकीकरण, प्रमुख फळे व भाजीपाला पिके यांचे रोपवाटीका व्यवस्थापन, रोपवाटिकेतील पीक संरक्षण, पोषण व्यवस्थापण, रोपवाटीकेसाठी शासनाच्या विविध योजना, रोपवाटीकेसाठी शासकीय परवाना विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.यासोबतच या प्रशिक्षणात भाजीपाला रोपवाटीकेत वाफे तयार करून ते निर्जुंतुक करणे, प्रो ट्रे रोपवाटीका तयार करणे, आंबा, पेरु इ फळपिकांचे विविध पध्दतीने कलम तयार करणे याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
या प्रशिक्षणात श्री सूचित लकडे, विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या), कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली, डॉ . सुहास पोतदार, प्राचार्य, आ नि कृ म वरोरा, सौ. मिली पुसदेकर, डॉ प्रशांत राखोंडे, श्री. नितीन गजभे, अनिल भोगावे, सहायक प्राध्यापक, आ. नि. कृ. म, वरोरा, श्री. मारुती वरभे, कृषि अधिकारी, वरोरा, या तज्ञांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणा अंतर्गत आनंदवन फळबाग प्रक्षेत्र, तालुका फळरोपवाटिका एकर्जूना, महविद्यालयातील सेंद्रिय शेती निविष्ठा उत्पादन केंद्र याठिकाणी क्षेत्रीय भेटीचे आयोजन कऱण्यात आले होते.
तीन दिवसीय प्रशिक्षण अत्यंत उत्साहात पार पडले तसेच प्रशिक्षणार्थीनी या प्रशिक्षणाबाबतीत समाधान व्यक्त केले.
प्रशिक्षणाच्या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पोतदार ,
यांनी भूषविले तसेच प्रमुख अतिथी म्हणून श्री सुधाकर कडू, विश्वस्त महारोगी सेवा समिती वरोरा, व प्रशिक्षण कार्यक्रम संयोजिका सौ. मिली पुसदेकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन हे डॉ. अनिल भोगावे यांनी केले.