Sunday, March 23, 2025
HomeSocialतथागत बुद्धांच्या मानवतावादी व विज्ञाननिष्ठ विचारांवर काळाची मर्यादा नाही - राजकुमार जवादे

तथागत बुद्धांच्या मानवतावादी व विज्ञाननिष्ठ विचारांवर काळाची मर्यादा नाही – राजकुमार जवादे

Tathagata Buddha’s humanistic and scientific thoughts have no time limit

चंद्रपूर :- तथागत भगवान गौतम बुद्धांनी Gautam Buddha 2500 वर्षापूर्वी जगातील मानवी समस्यांवर जो दुःख मुक्तीचा आणि मानवी कल्याणाचा मानवतावादी व विज्ञाननिष्ठ विचार संपूर्ण जगाला सांगितला तो आज देखील तितकाच प्रासंगिक आणि महत्त्वाचा आहे त्यामुळेच तथागत बुद्धांच्या विचारांवर काळाची मर्यादा पडलेल्या नाहीत असे प्रतिपादन BEF बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार जवादे केले. Tathagata Buddha’s humanistic and scientific thoughts have no time limit

ते संयुक्त जयंती समारोह समिती गडचांदूर ता.कोरपना जिल्हा चंद्रपूर द्वारे 24 मे 2024 ला सुयोगनगर बसस्थानक चौक, गडचांदूर येथे आयोजित तथागत बुद्धांच्या 2587 व्या जयंती समारोहाचे उदघाटक म्हणून बोलत होते. Buddha Purnima

पुढे बोलताना ते म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी Dr. Babasaheb Ambedkar स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्त्वावर आधारित बौद्ध धम्माचा आपल्या लाखो अनुयायांसह स्विकार केला. जगातील अनेक महान वैज्ञानिकांनी आणि विचारवंतांनी बुद्धाचे विचार स्विकारलेत त्यामुळेच संपूर्ण जग बुद्धांच्या समतावादी विचाराला मानत आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील सुप्रसिध्द प्रबोधनकार मनोज कोटरंगे हे होते.

यांनंतर याच ठिकाणी औरंगाबाद येथील ख्यातनाम गायक आणि प्रबोधनकार राहुल अनविकर यांच्या समाज प्रबोधन पर गित गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयुक्त जयंती समारोह समितीचे अध्यक्ष प्रा.रोषण मेश्राम यांनी तर आभार प्रदर्शन समितीचे कोषाध्यक्ष प्रा.प्रशांत खैरे यांनी केले

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular